Haryana Surajkund Accident: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात (Surajkund Mela News) एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील एक मोठा त्सुनामी नामक झुला अचानक कोसळल्याने मोठाअपघात (Accident) होऊनयात अनेक लोक जखमी झाले आहे. दरम्यानयाअपघातातझुल्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी पोहोचलेल्या एका पोलीस निरीक्षकासह दहाहुनअधिक लोक जखमी झाले. जखमी निरीक्षकाला गंभीर दुखापत झाली असूनत्यात त्यांचा मृत्यू झाल्याचीहीमाहितीआहे. पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त (डीसी) आयुष सिंह यांनी सांगितले की, या अपघातात एकूण 13 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास हा झुला कोसळला असून अचानक घडलेल्यायाघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Continues below advertisement

दरम्यान, जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. महत्वाचेम्हणजे यापूर्वी देखीलयाठिकाणी फूड कोर्टमध्ये एक गेट कोसळल्याने एक अपघात झाला होता, ज्यामध्ये दोन लोक जखमी झाले होते.

Haryana Surajkund Accident News : सूरजकुंड मेळ्यात एकाचदिवशी दोन अपघातांची नोंद

Continues below advertisement

दरम्यान, शनिवारी (7 फेब्रुवारी) सूरजकुंड मेळ्यात दोन अपघातांची नोंद झाली असूनत्यात अनेक लोक जखमी झाले. पहिला अपघात गेट कोसळल्याने झाला, तर दुसरा त्सुनामी झुला कोसळल्याने झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही अपघातांमुळे जत्रा समिती आणि आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या अपघातात एका मुलाला किरकोळ दुखापत झाली, तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जत्रेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. झूला कोसळल्याने परिसरात गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Surajkund Accident : प्रशासनाकडून बचावकार्य सुरू, घटनेची चौकशी सुरू

अपघातानंतर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. झूल्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी लोकांना घटनास्थळावरून दूर जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पोलिस प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने आयोजकांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

अधिक वाचा