एक्स्प्लोर

Haryana Accident : हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात झूला कोसळल्याने मोठा अपघात; बचावासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

Surajkund Mela News : फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील एक मोठा त्सुनामी नामक झुला अचानक कोसळल्याने मोठा अपघात होऊन यात अनेक लोक जखमी झाले आहे.

Haryana Surajkund Accident: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात (Surajkund Mela News) एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील एक मोठा त्सुनामी नामक झुला अचानक कोसळल्याने मोठा अपघात (Accident) होऊन यात अनेक लोक जखमी झाले आहे. दरम्यान या अपघातात झुल्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी पोहोचलेल्या एका पोलीस निरीक्षकासह दहाहुन अधिक लोक जखमी झाले. जखमी निरीक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त (डीसी) आयुष सिंह यांनी सांगितले की, या अपघातात एकूण 13 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास हा झुला कोसळला असून अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे यापूर्वी देखील या ठिकाणी फूड कोर्टमध्ये एक गेट कोसळल्याने एक अपघात झाला होता, ज्यामध्ये दोन लोक जखमी झाले होते.

Haryana Surajkund Accident News : सूरजकुंड मेळ्यात एकाच दिवशी दोन अपघातांची नोंद

दरम्यान, शनिवारी (7 फेब्रुवारी) सूरजकुंड मेळ्यात दोन अपघातांची नोंद झाली असून त्यात अनेक लोक जखमी झाले. पहिला अपघात गेट कोसळल्याने झाला, तर दुसरा त्सुनामी झुला कोसळल्याने झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही अपघातांमुळे जत्रा समिती आणि आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या अपघातात एका मुलाला किरकोळ दुखापत झाली, तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जत्रेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. झूला कोसळल्याने परिसरात गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Surajkund Accident : प्रशासनाकडून बचावकार्य सुरू, घटनेची चौकशी सुरू

अपघातानंतर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. झूल्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी लोकांना घटनास्थळावरून दूर जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पोलिस प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने आयोजकांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

अधिक वाचा

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget