एक्स्प्लोर

मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा

भाचीने मामाच्या घरातच 2 लक्ष रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून कारवाईच्या भीतीने काही दागिने तलावात पुरुन ठेवले, तर काही दागिने घरातील शौचालयात टाकले होते.

गोंदिया : आधी दागिने चोरले अन् कारवाईच्या भीतीने चोरलेले दागिने (Gold) शौचालयात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या (Gondia) आमगाव तालुक्यातील शिवनी येथील चोरीच्या घटनेचा अखेर पोलिसांनी उलगडा केला. विशेष म्हणजे, भाचीनेच मामाच्या घरुन सोन्या-चांदीचे दागिने पळविले होते, मात्र कारवाईच्या भीतीने घरातीलच शौचालयात दागिने टाकून दिले. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या भाचीने मामाच्या घरातच 2 लक्ष रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून कारवाईच्या भीतीने काही दागिने तलावात पुरुन ठेवले, तर काही दागिने घरातील शौचालयात टाकले होते. याप्रकरणी, पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तपासाअंती सत्य बाहेर आलं.

आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवणी येथील संगीता पाथोडे (39) यांनी आमगाव पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नणंदेच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी आपले सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी संगीता पाथोडे यांच्याकडे दिले होते. हे दागिने संगिताने पिशवीत गुंडाळून घरातील बेडरुममधील लाकडी पेटीत ठेवले होते. परंतु, 14 मार्च रोजी आरोपी भाग्यश्री मेंढे ही भाची वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लहान मुलाला घेऊन संगीताकडे मुक्कामी आली होती. 14 मार्च रोजी सायंकाळी संगिताने ते दागिने भाग्यश्रीला दाखविले होते. ते दागिने पाहून भाग्यश्रीला मोह सुटला आणि सायंकाळ होताच कुणी आपल्याला बघत नसल्याची संधी साधून तिने ते दागिने आपल्या बॅगमध्ये टाकले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 15 मार्च रोजी ती आपल्या गावी भोसा येथे ते दागिने घेऊन निघून गेली. 

इकडे घरात दागिन्यांची चोरी झाल्याचा कांगावा झाल्याने 22 मार्च रोजी दूरध्वनीवरून भाग्यश्रीला देखील विचारणा झाली. परंतु, तिने आपण चोरी केली नाही, असे सांगितले. दरम्यान सोन्याचे 3 हार, 3 जोड कानातले, 3 अंगठ्या, 1 जोड पायल व 3 जोड नथ, असे एकूण 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे आमगाव पोलिसांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस पथकाने संशयित आरोपी भाग्यश्री ही चोर असल्याचे उघडकीस आणले. 

पोलिसांनी खोदकाम करुन दागिने बाहेर काढले

दरम्यान, पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने कारवाईच्या भीतीने काही दागिने शौचालयात टाकल्याचे तर काही दागिने हे कामठा येथील तलावात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खोदकाम करून दोन्ही ठिकाणचे दागिने हस्तगत केले आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा

मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात दुसरा भोंदूबाबाही गजाआड, भोंदू गुरुमाऊली वीरकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी 
सोलापूर जिल्ह्यात दुसरा भोंदूबाबाही गजाआड, भोंदू गुरुमाऊली वीरकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी 
नागपुरात भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांवर भिरकावले दगड, वाहनचालकांमध्ये भितीचं वातावरण
नागपुरात भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांवर भिरकावले दगड, वाहनचालकांमध्ये भितीचं वातावरण
संतापजनक! बाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापानेच केला दोन्ही मुलींवर अत्याचार, डोंबिवली हादरलं
संतापजनक! बाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापानेच केला दोन्ही मुलींवर अत्याचार, डोंबिवली हादरलं
नंदूरबारमधील शहादा तालुक्यात हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त
नंदूरबारमधील शहादा तालुक्यात हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
केरळमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप निर्णय का झाला नाही? विजयानंतरही काँग्रेसमध्ये कोणती कुरघोडी सुरुय??
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
Share Market : अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
अमेरिका आणि इराण पु्न्हा संघर्षाच्या उंबरठ्यावर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले, स्टेट बँकेचा शेअर क्रॅश
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
तमिळनाडूतील राज्यपालांच्या तिढ्यानंतर आता दोन आमदार असलेल्या पक्षांकडून टीव्हीकेकडे मोठी मागणी; बहुमताची जुळवाजुळव झाली की नाही?
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? 99 टक्के लोक चुकीचं उत्तर देतात...
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, नेमकं काय घडलं?
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वाढला, प्रतिशेअर 17.35 रुपयांचा लाभांश जाहीर केला पण शेअर गडगडला, गुंतवणूकदारांना धक्का
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Embed widget