Gondia Crime : दारू का पितोस म्हणून पत्नीकडून पतीला जबर मारहाण; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पतीचा मृत्यू, गोंदियातील घटना
Gondia Crime News : पती दारू का पितो म्हणून पत्नीने जाब विचारात पतीला जबर मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन मधील हलबीटोला येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. यात पती दारू का पितो म्हणून पत्नीने जाब विचारात पतीला जबर मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राजकुमार मेश्राम (वय 48वर्षे, रा. हलबीटोला,) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी रामकला मेश्राम विरोधात सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतक राजकुमार हा घरी दारू पिवून येतो म्हणून पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झालं. यात तिने आरडा ओरड करत गोठ्यात असलेला लाकडी बासाचा मजबूत दांडा घेवून आपल्या पतीच्या डोक्यावर मारला. यात पती राजकुमार मेश्रामला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर राजकुमार रात्रभर त्याच अवस्थेत पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी मृतकाची पत्नी रामकला विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये गुन्हा दाखल केला असून पत्नीला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसा पोलीस तपास करत आहे.
नको ते धाडस अंगावर बेतलं, सती नदीत दुचाकीस्वार वाहून गेला
पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करत वाहन पाण्यात टाकल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील सती नदी पूलावर घडली. नशीब बलवत्तर म्हणून तेथे उपस्थित कामगार आणि पोलिसांनी त्या वाहून जाणाऱ्या इसमास वाचवण्यात यश मिळाले. अजय बाळकृष्ण रामटेके, वय 40 वर्षे, रा. श्रीराम नगर, कुरखेडा असे त्या इसमाचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. सती नदीच्या पूलावरूनही पाणी वाहत असताना अजय रामटेके यांनी धाडस करीत वाहन टाकले. मात्र क्षणातच ते वाहून गेले. यावेळी पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस जवान आणि कामगारामी दोरीच्या साह्याने वाहून जाणाऱ्या वाचवण्यात यश मिळवले. यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना नुसत धाडस करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















