संतापजनक! तीन वर्षांपासून शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य; तक्रारीनंतर सारं झालं उघड; गोंदियाच्या सडक अर्जुनीत गुन्हा दाखल
Gondia Crime news : गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Gondia Crime news : गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64 (2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम 4,6,12, आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांपासून शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य
दरम्यान, यातली आरोपी शिक्षकाने वर्ष 2023 पासून 2025 या जवळ जवळ तीन वर्षाच्या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असता चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.
लुक आउट नोटीस बजावण्यात आलेल्या फरार डॉक्टरच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल
भंडाऱ्याच्या साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 9 जुलैला त्यांच्या रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आईसोबत आलेल्या या मुलीवर डॉक्टरनं सोनोग्राफी कक्षात हे कृत्य केल्याची तक्रार साकोली पोलिसात दाखल करताचं डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता १६ दिवसांपासून हे डॉक्टर फरार असून पोलिसांनीही त्यांना शोधण्यासाठी लूक आउट नोटीस बजावला आहे. डॉक्टर देवेश अग्रवाल याला पळून जाण्यास मदत करणारे त्याचे दोन्ही भाऊ डॉ. भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांनाही पोलिसांनी आरोपी बनविले असून ते ही फरार झाले आहेत. यापूर्वी पोलिसांनी डॉक्टर देवेश अग्रवाल यांचे बँक खाते गोठवले असून पासपोर्ट आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा अहवाल शासनाकडं पाठवला आहे.
बंदूकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्यास तिघांना अटक
बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. रामभरोस सिताराम असे ट्रकचालकाचे नाव असून ते सावरगाव-मुरुमगाव रोड गडचिरोली कडे येत असताना ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेला होते. दरम्यान रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास 3 इसम चालकास उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली. परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी चालकाच्या छाती, डोक्यावर दोन बंदुक ठेवून मोबाईल जबरीने काढून घेतला आणि जिवे ठार मारण्याची धमकी देत पसार झाले. याबाबत चालकाने तक्रार दाखल करतात मुरूमगाव पोलिसांनी अशोक बोगा, घुमनसाय गावडे, सुकालु कोमरा तीघेही रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांना अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटी बंदुका आणि 11 नग काडतूस जप्त केले आहे.
आणखी वाचा


















