Gondia Crime News, Person dies due to mobile explosion : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध इथं सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. सुरेश संग्रामे (वय 55) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे. मृतक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना ही घटना घडली. गंभीर जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोबाईलचा स्फोट होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्याल?
मोबाईलचा स्फोट होऊ नागरिकांचा जीव जाणे किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुसंख्यजण मोबाईल वापरताना काही चूका करत असतात. कंपनीने म्हणजेच प्रोप्रायटरने उपलब्ध करुन दिलेल्या चार्जरशिवाय मोबाईल चार्ज करणं धोकादायक असू शकतं. मोबाईल एका कंपनीचा आणि त्याला चार्जर तिसराच वापरणे, हे देखील धोकायदायक ठरु शकते.
दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर जीवघेणा ठरु शकतो. हे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत. मोबाईलचा स्फोट होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरु शकतात? मोबाईलचा स्फोट होऊ नये, यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? याबाबत जाणून घेऊयात..
मोबाईलच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट शक्यता देखील असते
मोबाईलचा स्फोट होण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणजेच फोन तयार करण्यात येताना झालेल्या चूका हे आहे. हँडसेटमध्ये पॉवर देणारी बॅटरी फिट करत असताना तिची योग्य चाचणी करणे गरजेचे असते. याशिवाय असेंबली लाईनमधील बिघाडामुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. बाहेरचं वाढलेलं तापमान, जास्त प्रमाणा केलेली चार्जींग, किंवा खराब पद्धतीने बनवण्यात आलेल्या फोनचा स्फोट होऊ शकतो. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मोबाईलच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट शक्यता देखील असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या