Gondia Crime News : हृदयद्रावक! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच जन्मादात्या आईला संपवलं; हत्येच्या संशयावरून मुलाला अटक अन् विदारक सत्य बाहेर आलं
Gondia Crime News : गोंदिया तालुक्यातील दासगाव येथून एक अतिशय हृदयद्रावक घटना उजेडात आली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या संतापातून पोटच्या मुलानेच जन्मादात्या आईची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे.

Gondia Crime News : गोंदिया तालुक्यातील दासगाव येथून एक अतिशय हृदयद्रावक घटना उजेडात आली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या संतापातून पोटच्या मुलानेच जन्मादात्या आईची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. दरम्यान,हे कृत्य केल्यानंतर त्याने ही बाब लपवून ठेवली. मात्र पोलिसांना संशय येताच मुलाला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत मारेकरी मुलाने सत्य सांगितलं आणि या घटनेचं बिंग फुटलं आहे.
पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच जन्मादात्या आईची केली हत्या
पुढे आलेल्या माहितीनुसार, भारती सहारे (वय 44 वर्ष) असे या मृत आईचे नाव असून अखेर त्यांच्या मृत्यूचा उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून जन्मादात्या आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या 17 वर्षीय मुलावर रावणवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती सहारे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर गावातच नड्डे व अंडी विकून आपला उदरनिर्वाह करायची. दरम्यान, भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. असेच पैसे मागण्यावरून 26 जूनच्या रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला. या वादात मुलाने आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले आणि यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला.
....अन् खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला
या घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले. मात्र, पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर या घटनेचे बिंग फुटलं आणि विदारक सत्य बाहेर आलं. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पूढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू?
डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मुधोली येथे युवा पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनाने खुलासा केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं आहे. रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती. रुग्णवाहिका न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















