एक्स्प्लोर

Gondia Crime News : गोंदियातील बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टरचं टोकाचं पाऊल, स्वतःवर ब्लेड फिरवला अन्...

Gondia Crime News : गोंदिया (Gondia) येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. नितेश बाजपेयी यानं उपचारासाठी आलेल्या एका गरीब दांपत्यांचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Gondia Crime News : गोंदिया  (Gondia) येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. नितेश बाजपेयी यानं उपचारासाठी आलेल्या एका गरीब दांपत्यांचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या 10 दिवसाच्या चिमुकलीची तीन लाखात भंडाऱ्यात (Bhandara Crime News) विक्री केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून आता यातील मुख्य आरोपी असलेले डॉ.नितेश बाजपेयी यानं आत्महत्या करण्याच्या उद्देशानं स्वतःवर ब्लेडनं वार केलाय.

मध्यप्रदेशच्या कटंगी येथून भंडाऱ्याकडे येत असताना हा प्रकार घडलाय. रात्रीच्या सुमारास तुमसर ते नाकाडोंगरी मार्गावर हा प्रकार घडलाय. स्वतःच्या वाहनातून येत असताना डॉक्टरने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून हा प्रकार केल्याची बाब लक्षात येताच कारच्या चालकाने डॉक्टरला तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. मात्र, प्रकृती अत्यवस्था असल्यानं तेथील डॉक्टरनं पुढील उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर केलंय. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

Bhandara Crime News : बाळ विक्री प्रकरणात आणखी एकाला अटक, आरोपींची संख्या पोहचली सहावर

गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ नितेश बाजपेयी यानं उपचारासाठी आलेल्या एका गरीब दांपत्यांचं 10 दिवसाचं बाळ परस्पर भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात डॉक्टरच्या संपर्कातील एका महिलेला यापूर्वीचं अटक केली आहे. याचं डॉक्टरनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाला भंडाऱ्यात विकल्याचा आणखी एक प्रकार तपासात समोर आला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आणखी एकाला गोंदियातून अटक केली आहे. त्यामुळं आता बाळ विक्री करणाऱ्या आरोपींची संख्या 6 झाली असून अटक झालेल्या आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. सागर सिक्का असं अटक केलेल्या आरोपीचं नावं असून त्याला गोंदियातून अटक केली आहे. डॉ नितेश बाजपेयी आणि त्यांच्या रॅकेटनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाला भंडाऱ्यात विक्री केलं त्या प्रकरणात सागर सिक्का याला अटक केली आहे. आतापर्यंत बाळ विक्री प्रकरणी दोघांना अटक केली असून डॉक्टरसह अन्य तीन आरोपी फरार असून भंडारा पोलिसांचे दोन पथक त्यांच्या शोधार्थ रवाना केले आहे.

Crime : यांच्यावर आहेत दाखल गुन्हे 

१) डॉ नितेश बाजपेयी - गोंदिया

२) मालती वाघमारे - पांढराबोडी भंडारा

३) पौर्णिमा धुर्वे - गोंदिया

४) ललेश्वरी सादेपाच - गोंदिया

५) उमेशसिंग गहलोत - गोंदिया

या पाच पैकी ललेश्वरी सादेपाच हिला पोलिसांनी अटक केली आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget