Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा (Leopard Skin Smuggling Case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Nagpur Directorate of Revenue Intelligence) प्रादेशिक युनिटने अटक केली आहे. देवरी-पुराडा मार्गावरील ढिवरिनटोला परिसरात सापळा रचून धनराज उईके आणि नीलकंठ पांढरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील धनराज उईके हा माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे. आरोपींकडून पांढऱ्या कापडात गुंडाळलेली बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. कारवाईनंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी देवरी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Gondia Leopard Skin Smuggling Case)
दरम्यान, ही कातडी कुठून आणली, कोणाला विक्री केली जाणार होती आणि या तस्करीमागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, नागपूरच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक वन विभागाच्या (Forest Department) भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. परिणामीयाप्रकरणीआतापुढेनेमकंकायघडतंहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.
Gondia Crime: गोंदियाच्या सौंदड येथील एका घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त; पोलिसांनी केली एका आरोपीला अटक
गोंदियाच्या डुग्गीपार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील शास्त्री वार्डात कारवाई करत एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2 किलो 630 ग्राम गांजा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 1 लाख 31 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विदेश बडोले याच्या घरावर छापा टाकून झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत पोलिसांना घरातून 2 किलो 630 ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून गांजा आणि ईतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विदेश बडोले याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Wardha News: पवनगाव परीसरातील हल्लेखर वाघीण अखेर 18 दिवसानंतर जेरबंद; शेतकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव (करूळ) परिसरात वाघाने दहशत निर्माण करून अनेक जनावरांना ठार केले होते. 8 सप्टेंबरला पवनगाव येथील विशाल मून याच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. तर 9 सप्टेंबरला शेतपिक सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार समिर कुणावार यांनी यासंबंधी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून तातडीने या वाघीणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती. शेवटी 18 दिवसांनंतर हल्लेखोर वाघीणीला पकडण्यात वनविभागाच्या टिमला यश मिळाले आहे. आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी भेट देतपाहणीकेली. परिणामीआता शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडलाआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
