एक्स्प्लोर

Gondia Crime News: हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?

Gondia Crime News: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन व केटरिंगचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या भाजप नगराध्यक्षावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

Gondia Crime News: गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन व केटरिंगचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या भाजप (BJP) नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तिरोड्याचे नगराध्यक्ष अशोक असाटी (वय 54, रा. तिरोडा) आणि कैलास किसन वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

Gondia Crime News: 25 लाखांच्या बिलासाठी लाचेचा हप्ता

तक्रारदाराचा डेकोरेशन आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 दरम्यान प्रशासनाला सेवा पुरवली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर, 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी 'हर्षल केटरिंग'च्या नावाने 7 लाख 72 हजार रुपये आणि 'उज्वला डेकोरेशन'च्या नावाने 17 लाख 50 हजार रुपये, असे एकूण 25 लाख 22 हजार रुपयांचे बिल मंजुरीसाठी नगरपरिषदेकडे सादर केले होते.

या बिलाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार 21 मे 2026 रोजी नगराध्यक्ष अशोक असाटी यांना भेटायला गेले. त्यावेळी असाटी यांनी हे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 3 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची (Bribery) मागणी केली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी 7 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.

Gondia Crime News: हातावर रक्कम लिहून केली होती मागणी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली. यावेळी तक्रारदारास 6 लाख रूपयांचा चेक दिल्याच्या मोबदल्यात 1 लाख 20 हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम पीए शुभम भोयर याच्याकडे देण्यास सांगितले. तसेच 10 लाख रूपयांचा चेक मिळाल्यावर त्याचे जे होतील ते आणून देशील, अशा प्रकारची लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.  यावर विभागाने 9 जून रोजी सापळा लावला व तक्रारदारास असाटीच्या कार्यालयात रक्कम घेऊन पाठवले असता, शुभम भोयर व असाटी यांना तक्रारदाराच्या वागणुकीवर संशय आल्याने त्यांनी पैसे घेण्यास टाळाटाळ केली होती. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. 21 मे रोजी झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी तोंडी लाचेची मागणी न करता तक्रारदाराच्या उजव्या हातावर '3,20,000' अशी रक्कम लिहून लाचेचा इशारा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Gondia Crime News: भाजपचा नगराध्यक्ष ताब्यात

सापळा कारवाई दरम्यान थेट रक्कम स्वीकारली नसली, तरी पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाली होती. त्यामुळे अखेर पोलिस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष अशोक असाटी याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

 

आणखी वाचा 

Nashik Crime : दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget