एक्स्प्लोर

25 जणांच्या मृत्यूनंतर थायलंडला पळालेल्या लुथरा बंधूंना दिल्लीतून अटक; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिक्रियेस नकार

गोव्यातील बर्च नाईटक्लबला लागलेल्या आगीच्या पाचव्या दिवशी, क्लब मालक आणि भाऊ सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

पणजी: गोव्यातील हडपडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात (Fire) 25 निष्पाप नागरिकांची जीव गमावला. या घटनेनंतर देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. तर, याप्रकरणातील क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे घटनेनंतर फरार झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही बंधू थायलंडला पळून गेले होते. मात्र, अखेर 25 नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन्ही लुथरा बंधूंना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. गोवा (Goa) पोलिसांनी (Police) दिल्लीतून दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आता गोव्यातील मोपा विमानतळावरून गोव्यात आणले आहे. याप्रकरणी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारणा केली असता, प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  

गोव्यातील बर्च नाईटक्लबला लागलेल्या आगीच्या पाचव्या दिवशी, क्लब मालक आणि भाऊ सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. हातकड्या घातलेल्या आणि त्यांचे पासपोर्ट धरलेल्या भावांचे फोटो थायलंड पोलिसांकडून समोर आले होते. 6 डिसेंबर रोजी बर्च नाईटक्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, दोन्ही लुथरा बंधू भारतातून पळून थायलंडला पळून गेले. त्यानंतर, गोवा पोलिसांकडून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. इंटरपोलने भावांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली असून गोवा पोलिसांनी त्यांचे पासपोर्टही निलंबित केले होते. 

थायलंडकडून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण 

क्लबमधील अग्नितांडवानंतर थायलंडमध्ये पसार झालेल्या लुथरा बंधूंविरुद्ध थायलंड सरकारने हद्दपारीची प्रक्रीया पूर्ण केली. त्यानंतर सोमवारी दोन्ही आरोपींचे भारतीय दूतावासाकडे हस्तांतरण करण्यात आले. लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते, तिथे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून गोवा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर आता त्यांना गोव्यात आणण्यात आले आहे. दरम्यान, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ क्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना घडली तेव्हाच क्लबचे मालक असलेले लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते. याबाबत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लुथरा बंधूंना अटक केली यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा

मोठी बातमी : अजित पवार मुंबईत महायुतीतून बाहेर पडणार, आजच मोठा निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना
लग्न होताच सासू-सासऱ्यांना विषारी औषध दिलं; नवरी आणि करवलीचा डेंजर प्लॅन, जळगावमधील थरकाप उडवणारी घटना
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Embed widget