Mumbai Crime News : मुंबईच्या अंधेरी पूर्व (Andheri East) भागात सोनसाखळी आण मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांच्या या टोळीला अंधेरी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीचे 120 मोबाईल जप्त (Mobile phone seized) करण्यात आले आहेत. मोबाईल (Mobile) चोरट्याने 2 दिवसापूर्वी चक्क SP ऑफिसच्या समोर फोनवर बोलत असलेला व्यक्तीचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती.
10 लाख रुपयांचे मोबाईल जप्त
दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत एका तासाच्या आत तांत्रिक तपास करत एमआयडीसी मालपा डोंगरी परिसरामधून सराईत मोबाईल चोरट्यांची टोळीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून अंधेरी पोलिसांनी 120 मोबाईल जप्त केली आहेत. यामध्ये 120 मोबाईलचा बाजार भाव जवळपास 10 लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे अंधेरी परिसरामध्ये फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल स्नॅचिंग करुन पळून जात होते.
अटक केलेल्या आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्यामध्ये प्रसाद सिताराम गुरव वय 31वर्षे, विवेक ओमप्रकाश उपाध्याय वय 27 वर्षे ,रवी बाबू वाघेला वय 34 वर्षे असून हे तिन्ही आरोपी अंधेरी परिसरात राहणारे आहेत. अटक आरोपी यापूर्वी मुंबई परिसरात आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे. या चोरांच्या टोळीमध्ये आणखी काही सदस्य आहेत का? या संदर्भात अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चोरांकडून तब्बल 10 लाख रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही भागात घरफोड्या होताना दिसत आहेत. तर काही भागात मोबाईल चोरांसह सोन्याच्या वस्तू चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गर्दीच्या ठिकाणी चोरांच्या टोळ्या आहेत. योग्य वेळ साधून चोरटे डल्ला मारत आहेत. विशेषत: रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मुख्य रस्ते अशी ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय.
महत्वाच्या बातम्या: