एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : 82 गुन्हे, 31 चकमकींसह अनेक नक्षली कारवाईत सहभाग; लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यासह चौघे पोलिसांना शरण

तब्बल 28 लाख रुपये बक्षीस असलेल्या एक वरिष्ठ कॅडरच्या नक्षलसह एक एरिया कमिटी मेंबर आणि दोन सदस्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केलंय.

गडचिरोली : तब्बल 28 लाख रुपये बक्षीस असलेल्या एक वरिष्ठ कॅडरच्या नक्षलसह एक एरिया कमिटी मेंबर आणि दोन सदस्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण (Gadchiroli Naxal) केलंय. अशोक सडमेक उर्फ चंद्रशेखर, वनिता झोरे, साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा असे आत्मसर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. अशोक हा नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेता असून वनिता टेक्निकल टीमची सदस्य तर साधू आणि मुन्नी ह्या सदस्य आहेत. अशोक वर 82 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 31 चकमक 17 जाळपोळ आणि 34 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर शासनाने 16 लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर वनिता हिच्यावर 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये एक चकमक, दोन जाळपोळ 8 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तिच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस होते.

तसेच साधूवर चार गुन्हे दाखल असून त्याच्यावर चार लाखाचे तर मुन्नीवर दोन लाखाचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांच्या टीसीओसी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे. कारण याच कालावधीमध्ये नक्षल चळवळ आक्रमक होत असते.

नक्षलवाद्यांच्या टीसीओसी मोहीम म्हणजे काय? 

दरम्यान फेब्रुवारी ते जून या कालावधीत नक्षलवादी संघटना नक्षलप्रभावित भागात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन (TCOC) चालवतात. या 4 ते 5 महिन्यांत नक्षलवाद्यांकडून राबवले जाणारे 'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी पोलिसांसाठी शहीद आठवड्यापेक्षा काही अंशी  आव्हानात्मक असल्याचे बोलले जाते. कारण याच कालावधीत नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अलिकडे पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या तळावर केलेले हल्ले आणि अनेक डाव उधळल्यानंतर नक्षली चळवळ काहीशी खिळखीळी झाली आहे. तर पोलीसही याच कालावधीत नक्षलवादाच्या माध्यमातून देशाच्या व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या सशस्त्र लढाईला चोख प्रतिउत्तर देतात. 

गडचिरोली जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे 404 कोटींच्या निधीची मागणी

गडचिरोली जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक आज (3 फेब्रुवारी) दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तर मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेला निधी अद्याप का खर्च झाला नाही, काय अडचण आहे, याबाबत विचारणा करून अधिकाऱ्यांचे कान टोचले आणि निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या.

हे ही वाचा 

Devendra Fadnavis : नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं; मुख्यमंत्र्याकडून चोख प्रत्युत्तराची डेडलाईन, म्हणाले..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget