गडचिरोली: जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार

शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 55 वर्षीय शिपाया विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार. याप्रकरणी शाळेतील शिपाई फ्रान्सिस आशिष पिंटो विरोधात गुन्हा नोंद. डिसेंबर 2024 पासून 24 मार्चपर्यंत शाळेतील शिपाई फ्रान्सिस पिंटो याने पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला शाळेच्या परिसरातील बाथरूममध्ये नेले. या शिपायाने पीडित मुलीच्या शरीरावरील विविध भागांवर चिमटे काढत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

 भाजपच्या नेत्याला सिरीयातून धमकी

भाजपचे प्रदेश प्रवक्ता अजय पाठक यांना विदेशातून धमकीचा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. पाठक यांनी पोलिसांकडे तशी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अजय पाठक यांनी आपल्याला सिरीयातून फोन आल्याचा संशय व्यक्त केला आहे. नागपूर दंगलीबाबत प्रसारमाध्यमांवर मत व्यक्त केल्यामुळे आपल्याला धमकी आल्याचे मत पाठक यांनी व्यक्त केले. भविष्यात विरोधात भूमिका घेतली तर बघून घेऊ, असे फोनवरुन धमकावण्यात आल्याचे अजय पाठक यांनी सांगितले. त्यामुळे आता नागपूर पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

डोळ्यावर पट्टी बांधून शरीरसंबंध ठेवायला राजी केलं, सावत्र बापाला गाफील ठेवून मुलीने गुप्तांगावर केले वार, नालासोपऱ्यातील घटना कॅमेऱ्यात कैद

शाळेत जाताना खाऊ देण्यासाठी बोलावलं अन्...; चौथीत शिकणार्‍या मुलीवर 27 वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार, पुण्यातील घटनेनं संताप