गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी घडलेल्या भीषण सर्पदंश प्रकरणी (Gadchiroli Ashram School Tragedy) अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्था सचिव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह शाळेच्या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी 12 ऑगस्ट रोजी जपतलाई आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर या कारवाईची अधिकृत माहिती दिली.

Gadchiroli Snake Bite Case : 'या' 5 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

धानोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये खालील 5 जणांचा समावेश आहे:

Continues below advertisement

1. मारोतराव कोवासे (माजी खासदार व संस्था अध्यक्ष)2. विश्वजीत कोवासे (जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व संस्था सचिव)3. प्रशांत ताटपल्लीवार (शाळेचे मुख्याध्यापक)4. भाष्कर भोयर (वसतिगृह अधीक्षक)5. भाग्यश्री चिल्लमवार (महिला वसतिगृह अधीक्षिका)

सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून चार सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर 12 ऑगस्टच्या पहाटे ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बाल न्याय अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gadchiroli Tragic Incident : 10 ऑगस्टच्या रात्री नक्की काय घडले?

धानोरा येथील निवासी आश्रमशाळेत 10 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी जेवण करून झोपलेल्या असताना 6 विद्यार्थिनींना विषारी सर्पाने दंश केला.

मृत विद्यार्थिनी :

1. दीपिका लकडा (इयत्ता 6 वी)2. सुष्मिता मंडल (इयत्ता 8 वी)3. अनु कोरेटी (इयत्ता 2 री)

दीपिका मदवी (इयत्ता 5 वी), कविता किरंगा (इयत्ता 6 वी) आणि समृद्धी नैताम (इयत्ता 8 वी) यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी नैताम हिची प्रकृती चिंताजनक आहे.

Gadchiroli Ashram School Tragedy : दोषींवर निलंबनाची कारवाई होणार

आश्रमशाळेतील प्रशासकीय निष्काळजीपणामुळेच तीन निष्पाप विद्यार्थिनींचा जीव गेल्याचा प्राथमिक निष्कर्ष समितीने काढला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहे.

ही बातमी वाचा: