एक्स्प्लोर

अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोर्चा आता पुण्याकडे, स्वारगेट परिसरात टाकली अचानक धाड

राज्यातील विविध शहरानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागानं (एफडीएने) आपला मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. पुण्यात धाड सत्र सुरु करण्यात आलं आहे. 

पुणे : सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात  त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे, पुन्हा एकदा गुटखा विक्रेते आणि मेडिकल क्षेत्रातील काळे धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत. अशातच राज्यातील विविध शहरानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागानं (एफडीएने) आपला मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. पुण्यात धाड सत्र सुरु करण्यात आलं आहे. 

जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासन विभागानं पुण्यातील स्वारगेट बस स्टॉप वर असलेल्या सगळ्या दुकानांवर अचानक धाड टाकली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांची टीम पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पाच ते साडेपाचच्या दरम्यान दाखल झाली होती. विविध दुकानांमध्ये पाहणी करून त्यांची माहिती घेऊन सूचना सांगण्यात आल्या. दुकाने देखील खाली करुन जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई होणार

तुकाराम मुंढे यांनी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह, हॉटेल व्यवासायिकांसह, दूध भेसळांवरील कारवाईचा धडाका लावल्यानंतर मेडिकल दुकानदारांनाही इशारा दिला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा दणका दिला आहे. "रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे," असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुटखा आणि निकोटीनयुक्त पानमसाल्यावर आधीपासूनच बंदी आहे. मात्र बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून हा व्यापार सुरू असल्याचे अनेक तपासांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे आता केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन म्हणून नव्हे, तर संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिले जाणार आहे.

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget