एक्स्प्लोर

Palghar Hospital Row : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

Palghar Hospital Doctor Assault Eknath Shinde Action: पालघर येथील रिलीफ रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख राहुल घरतची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Palghar Hospital Row News : पालघर येथील 'रिलीफ' या खासगी रुग्णालयात दहीहंडीतील जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्याच्या वादावरून शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ कडक पावले उचलत आरोपी शिवसेना शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच पालघर रुग्णालयातील या धुडगुसाचा उल्लेख न्यायालयाने केला. देशात कायद्याचे राज्य आहे की नाही? डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या लोकांना रस्त्यावर मोकाट फिरायला नको, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली. 

Eknath Shinde Action : राहुल घरतची हकालपट्टी; शिंदेंनी उपटले कार्यकर्त्यांचे कान

सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. "पालघरमधील रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत चुकीची आणि निंदनीय आहे. डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर हात उचलणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. काहीही अडचण असली तरी कायदा हातात घेणे चुकीचे आहे," असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.

तसेच या प्रकरणात थेट कारवाई करत शिवसेनेचे पालघर शहरप्रमुख राहुल घरत (Rahul Gharat) याचे पक्षातून तात्काळ निलंबन करून त्याची हकालपट्टी केली. या प्रकरणात राहुल घरतला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

FIR Against 17 People : भाजप आमदार राजेंद्र गावितांच्या मुलासह 17 जणांवर गुन्हा

पालघरच्या रिलीफ रुग्णालयात रिसेप्शनिस्टला मारहाण आणि डॉक्टरांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, भाजप आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित आणि राहुल घरत यांच्यासह तब्बल 17 जणांवर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Injured Govinda Complaint : जखमी गोविंदांचीच पोलिसांत तक्रार

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला आता एक नवी कलाटणी मिळाली आहे. ज्या जखमी गोविंदांना डिस्चार्ज देण्यावरून हा सर्व वाद पेटला होता, त्याच गोविंदांनी आता रिलीफ रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

"आम्हाला केवळ किरकोळ दुखापत झाली होती. तरीही डॉक्टर जाणीवपूर्वक डिस्चार्ज न देता गरज नसताना आम्हाला आयसीयूमध्ये (ICU) ठेवून मोफत उपचारांऐवजी आर्थिक फायद्यासाठी अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. वारंवार विनंती करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आम्ही शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांची मदत मागितली होती," असा दावा जखमी गोविंदांनी केला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोविंदांनी केली आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Jalgaon Accident News: आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला, वाटेतच काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला, वाटेतच काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Paithan Accident : भीषण अपघात! पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची धडक, बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी अंत
भीषण अपघात! पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची धडक, बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी अंत
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget