UP Crime news : स्वत:ला विसरून आई मुलांना घडवत असते. ‘आई’ या दोन अक्षरी शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आई आणि मुलाचं नाते प्रेमाचं अन् मायेचं नातं प्रतिक असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं ‘आई’ हे अमूल्य नातं आहे. पण दिवाळीच्या सणाला याच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ड्रग्ज आणि दारुच्या आहारी गेलेल्या एका नराधम मुलानं आईवर बलात्कार केल्याचा प्रसंग घडलाय. या कलियुगातील मुलाने आई-मुलाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासलाय. 


उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये दिवाळीच्या दिवशी पोटच्या मुलानं चाकूच्या धाकावर आईवर बलात्कार केला अन् पवित्र नात्याला काळीमा फासला. महाराष्ट्रात ड्रग्जवरुन राजकारण पेटलं असतानाच ड्रग्जमुळे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनं पोलिस स्थानकात मुलाबाबत तक्रार दाखल केली आहे. ड्रग्ज आणि दारुच्या आहारी गेलेल्या मुलानं चाकूचा धाक दाखवत अतिप्रसंग केल्याचं आईनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर टीला मोड पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी आरोपी मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीला मोड पोलिस स्थानकाच्या क्षेत्रामध्ये डोपडपट्टीमध्ये दिवाळीत गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. मुलगा दारु आणि ड्रग्जच्या नशेत रात्री घरी पोहचला. चाकूच्या धाक दाखवत त्यानं आईसोबत अतिप्रसंग केला. पोलिस अधिक्षक ज्ञानेंद्र सिंह यानी महिलेनं दिलेल्या तक्रारीच्या हवाल्यानं सागिंतलं की, पिडीत महिला इतरांच्या घरात घरकाम करत आपलं घर चालवतं. त्या महिलेवर दिवाळीच्या दिवशी मुलानं अतिप्रसंग केला. महिलेनं मुलाला या कृत्याला विरोध दर्शवल्यानंतर नशेत असणाऱ्या मुलानं चाकूच्या धाक दाखवत अतिप्रसंग केला. महिलेनं आपल्या मुलाविरोधात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. शुक्रवारी मुलाला अटक करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरु आहे.


पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, ‘माझा पती रामपूरमध्ये वास्तव्यास आहे. तोही ड्रग्जच्या आहारी गेलाय. पती घर चालवण्यासाठी एक रुपायाही देत नाही. मी घरकाम करुन चार मुलाचं पोट भरते. मुलगा माझ्याबरोबर असं काही करेल स्वप्नातही वाटलं नव्हतं. मुलगा वाईट व्यक्तींच्या संगतीमध्ये राहतो. त्यालाही ड्रग्जचं व्यसन आहे. त्याच्याकडे नेहमी चाकू असतो. तोंडामध्ये ब्लेड धरलेला असतो. स्वभावाने तो अतिशय क्रूर आहे. नेहमी येथील लोकांसोबत भांडण करतो.’