Dhule Crime News : गुजरात (Gujarat) राज्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) येत असलेला लाखो रुपयांचा गुटखा (Gutkha) धुळे (Dhule) जिल्ह्यातील  स्थानिक गुन्हे शाखेने साक्री तालुक्यातील वार्सा गावाजवळ जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं गुटखा आणि वाहन असा सुमारे 41 लाख 55 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत होती. याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून वार्सा ता. साक्रीकडे कारमधून गुटखा येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हॉटेल कांकणी दरबारजवळ सापळा रचला होता. यावेळी एक पिकअप वाहन आणि एक इको कार संशयास्पदररित्या आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी वाहनातील लोकांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे पंकज कैलास भोई वय 39  रा. वृंदावन नगर पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे, रामरतन अवधराम प्रजापती जि. धुळे अशी सांगितली. सदरचा माल हा रविंद्र साबळे यांचा असल्याचे सांगितले. वाहनांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला विमल आणि इतर कंपन्यांचा गुटखा व वाहन असा सुमारे 41 लाख 55 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 


महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला गुटख्याची वाहतुक करताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पिंपळनेर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे, कशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


महत्त्वाच्या बातम्या:


छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; पोलिसांत गुन्हा दाखल; शहरात एकच खळबळ