Dhule Crime News : थरारक! पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; पिस्तुलीचा धाक दाखवून 22 हजारांची रोकड लांबविली
Dhule Crime : धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर पिस्तुलधारी चार दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकलाय.

Dhule Crime News : धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सदाशिव पेट्रोलियम पंपावर आज पहाटेच्या सुमारास पिस्तुलधारी चार दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकलाय. यात सुमारे 22 हजार रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पिस्तुलाचा धाक दाखवून 22 हजार रुपयांची रोकड लुटली (Robbed of Rs 22,000 Cash at Gunpoint)
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चार संशयित एकाच दुचाकीवर येऊन पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तुल होते. पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवळी, सुनील नगराळे व संतोष नगराळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर रोकड भरलेली बॅग हिसकावून घेऊन चौघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Dhule Crime News)
दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले असल्यामुळे त्यांची ओळख स्पष्टपणे पटली नाही. घटनेच्या वेळी पेट्रोल पंपाच्या शेजारील हॉटेल बंद होते. तसेच सुरक्षा रक्षक रजेवर होता. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी ही धाडसी चोरी केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
कल्याण पूर्वेत सराईत गुंड्याची दाल वडा नाही दिला म्हणून भाईगिरी! (Kalyan Crime News)
कल्याण पूर्वेत सराईत गुंड्याची भाईगिरी बघायला मिळाली आहे. दाल वडा नाही दिला म्हणून जामिनावर सुटून आल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुंड दिनेश लंके याने हॉटेल चालकाला मारहाण केलीय. तर प्रतिउत्तर दिल्यावर चक्क हत्यार दाखवत दुकानदाराला हात जोडत पाया पडायलाही लावलंय. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झाला आहे. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा साध्य पोलीस शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















