Dharashiv News : धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरतअसलेल्या तानाजी विठ्ठलराव जाधव यांनी गळफास घेऊन आपलीजीवनयात्रासंपवलीआहे. काल (15 फेब्रुवारी) संध्याकाळी 7:30 च्या सुमारास हि आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवचा लोहारा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयातील हि दुर्दैवी घटना असूनहेटोकाचंपाऊलउचलण्यापूर्वीएकचिट्ठीदेखीलसोडलीआहे. संस्थाचालक आणि सहकारी शिक्षकाकडून त्रास होत असल्याचाउल्लेखया सुसाईड नोटमध्येकरण्यातआलाआहे. परिणामीपोलीसआतायाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे.

Dharashiv Crime News : संस्थाचालक व सहकाऱ्यांच्या होत असलेल्या जाचाला कंटाळून टोकाचंपाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये संस्थाचालक व सहकाऱ्यांच्या होत असलेल्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला आहे. मात्रया या प्रकरणामुळे धाराशिवच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Wakad Crime : वाकड परिसरात पार्किंगच्या 15 फूट खोल खड्ड्यात पडून 3 वर्षांची बालिका गंभीर जखमी, बिल्डरवर गुन्हा दाखल

पिंक सिटी रोडवरील अस्वानी गॅलक्सी सोसायटीमध्ये खेळत असताना सुरक्षेअभावी एका 3 वर्षीय बालिकेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत बिल्डर आणि पार्किंग सिस्टमच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 च्या सुमारास अस्वानी गॅलक्सी सोसायटीच्या गार्डनमध्ये श्रीजा अनिल सांगळे वय 3 वर्षे 9 महिने ही चिमुकली इतर मुलांसोबत खेळत होती. या गार्डनच्या अगदी जवळच एफ विंगचे पार्किंग पिट खड्डा आहे. मात्र, या खड्ड्याला कोणतीही संरक्षक भिंत, कठडा किंवा साधी जाळी देखील लावलेली नव्हती. खेळण्याच्या ओघात श्रीजा या अर्धवट बांधकाम असलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अस्वानी पॅराडाईज कंपनीचे बिल्डर आणि किंग मल्टीलेव्हल कार पार्किंग सिस्टमचे संचालक जगन्नाथ राऊत यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा