Dharashiv: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हदरला असून हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवच्या सरपंचावर (Dharashiv Crime) झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने गावासह परिसरात दहशतीचे वातावरण आहे .आता धाराशिवमधील सरपंच हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली असून तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचं लायसन्स (Gun Licence) मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं आहे . सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील गनकल्चरवरून ओरड सुरू असताना सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल,गन बाळगण्याचं लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल ते केलं जात असल्याचंही समोर येत आहे . तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचा लायसन्स मिळवण्यासाठी जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे . बनाव रचल्याची भांडाफोड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे .
पोलीस तपासात तुळजापूरच्या सरपंचाची भांडाफोड
धाराशिव चा तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम हे रात्री बारूळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत असताना दोन्ही बाजूंनी अचानक दुचाकीस्वार आले . निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून आत मध्ये पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त होतं . या घटनेने मोठी खळबळ उडाली होती . गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या ही सातत्याने समोर येत होत्या . प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली . मात्र आता तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात पोलीस सूत्रांकडून खळबळजनक माहिती समोर आली असून हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द सरपंचानेच केला असल्याचं उघड झालं आहे .
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांना जिवंत जळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. महाराष्ट्रभरात तुळजापूर येथील घटनेने खळबळ उडाली होती, पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर आली. सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःच हल्ल्याचा बनाव रचल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांची सात पथक तयार करत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तपासाची चक्र फिरवली असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंदूक परवाना मिळण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी हे कुभांड रचल्याच उघड झालंय.
पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन
आरोपींना अटक करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन त्यांनी केलं होतं . सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं . बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे . आरोपींचा शोध घ्यायला यासाठी सरपंच सहगावकरांनी आंदोलन सुरू केलं होतं . पण आता हा सगळा बनाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे . यावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे .
हेही वाचा: