Santosh Deshmukh Case बीड : लॅपटॉपमधून जो डेटा रिकव्हर झाला आहे आणि जो दिसतो आहे, तोच पुरावा म्हणून वापरला जाणार असे लेखी स्वरूपात देण्यात आले. मात्र आरोपींच्या वकिलांकडून प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा काढून तारीख कशी टळेल, याचा हा प्रयत्न आहे. मात्र याबाबत पुढील तारखेत निर्णय घेतला जाईल अशीअपेक्षाआहे. विष्णू चाटेच्या अर्जावर वकिलामार्फत म्हणणे मांडले जाईल. अशीमाहितीदिवंगतसरपंचसंतोषदेशमुख  (Santosh Deshmukh Case) यांचेबंधूधनंजयदेशमुखयांनीदिली (Dhananjay Deshmukh) आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळीत्यांनीहिमाहितीदिलीय.

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाला अन् गावाला न्याय देणे महत्त्वाचं, अन्यथा मीच उमेदवार झालो असतो

स्वरूपानंद देशमुख कायबोलता त्याच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही. स्वरूपानंद देशमुख यांना स्वाभिमानी मस्साजोगची जनता उत्तर देतील. मला केस महत्त्वाची आहे, माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणे महत्त्वाचं आहे. नाहीतर मीच उमेदवार झालो असतो. मात्र या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या. माझ्या कुटुंबावर कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये, 28 तारखेला सर्व मतदान रुपी स्पष्ट होईल असेहीधनंजयदेखमुखम्हणाले. रूपानंद देशमुख यांना कोणी उभा केलंहोतं, यावर निकालानंतर वहिनी आणि मी आम्ही स्पष्टीकरण देऊ, असेहीतेम्हणाले.

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh : पीडित कुटुंबाला बोलणं हे कितपत उचित आहे?

माझ्या भावाने दलित बांधवांसाठी प्राणाची आहुती दिली. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी बैठकीत मी रस घेतला नाही. मात्र,याचे उत्तर येणाऱ्या आठ-दहा दिवसात मिळेलच, त्यावर चर्चा करणे उचित नाही. राजकारण या ठिकाणी दुय्यम स्थानी आहे. माझ्यासाठी केस हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यावर जास्त फोकस आहे. 29 तारखेला सविस्तर यावर उत्तर देईल. स्वरूपानंद देशमुख यांना जो कोणी पाठिंबा देईल ते जाहीर होईल, गुपित पाठिंबा देणार नाही. लोकशाहीत प्रत्येकांना व्यक्ती स्वातंत्र आहे. पीडित कुटुंबाला बोलणं हे कितपत उचित आहे? हे ज्याला त्याला कळालं पाहिजे, असेहीधनंजयदेशमुखम्हणाले. म्हणून मी राजकीय भाष्य न करता येणाऱ्या काळात सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे, असेहीस्पष्टीकरणत्यांनीयावेळीदिले.

ही बातमी वाचा: