Delhi UPSC Student Murder Case: दिल्लीतील तिमारपूर भागात झालेल्या यूपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी रामकेश मीणाच्या (Ramkesh Meena Murder Case) हत्येप्रकरणी पोलिसांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. रामकेश मीणाचा मृतदेह ज्या घरातून सापडला त्या घरातून पोलिसांनी एक हार्ड ड्राइव्ह मिळाली होती. या हार्ड ड्राईव्हमध्ये जवळपास 15 महिलांचा अश्लील व्हिडीओ आढळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आता हार्ड ड्राइव्ह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. हार्ड ड्राइव्हवर सापडलेले व्हिडीओ महिलांच्या संमतीने बनवले गेले होते की, त्यांना स्वतःला या घटनेची माहिती नव्हती याचा तपास दिल्ली पोलीस आता करत आहेत.

Continues below advertisement

अमृता सिंग चौहान चौकशीत काय म्हणाली? (Delhi UPSC Student Murder Case)

अमृता सिंग चौहानने रामकेश मीणाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. आरोपी आणि रामकेशची लिव्ह-इन पार्टनर अमृता सिंग चौहान हिने चौकशीदरम्यान असेही सांगितले की, रामकेश यांनी तिचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ तिच्या परवानगीशिवाय काढले होते. अमृताने तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ डिलीट रामकेश मीणाने नकार दिला, अशी माहिती आरोपीने अमृताने स्वत: दिली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, अमृताने गुन्ह्याची कबुली दिली आणि घटनाक्रम सविस्तर सांगितला. अमृता चौहान म्हणाली की, मे 2025 पासून तिचे मृत रामकेश मीणासोबत संमतीने संबंध होते. रामकेशला अश्लील फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले असता, त्याने नकार दिला. यानंतर अमृताने हा सगळा प्रकार माजी प्रियकर सुमित कश्यपला सांगितला. सुमितने त्याचा मित्र संदीप याला या हत्येत सामील केले. 5-6 ऑक्टोबरच्या रात्री तिघांनीही रामकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली. गॅस सिलेंडर वितरक सुमितने सिलेंडर उघडा ठेवून एक स्फोट केला.

अमृता चौहान हीने हा सगळा कट रचल्याची माहिती समोर (Ramkesh Meena Murder Case)

दिल्लीतील तिमारपुर भागात 5 ऑक्टोबर रोजी यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीणाची (Ramkesh Meena) आग लागल्यामुळे मृत्यू झाल्याची (Delhi UPSC Student Murder Case) माहिती समोर आली होती. मात्र रामकेश मीणाचा आगामुळे मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अमृता चौहान (21), सुमित कश्यप (27) आणि संदीप कुमार (29) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रामकेश मीणासोबत सहमतीने राहणाऱ्या अमृता चौहान हीने हा सगळा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.  

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? (Ramkesh Meena Murder Case)

5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दिल्ली पोलिसांना गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, पण आतील दृश्य धक्कादायक होते. तिथे एक जळालेला मृतदेह पडला होता. तो 32 वर्षीय रामकेश मीणाचा असल्याचे समजले, जो तिथेच राहतो आणि यूपीएससीची तयारी करत होता. सुरुवातीला हा गॅस गळतीचा अपघात असल्याचे मानले जात होते, परंतु मृतदेहाची स्थिती आणि खोलीत विखुरलेल्या वस्तुंमुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. घटनेनंतर, जेव्हा गुन्हे पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संपूर्ण कट उलगडू लागला.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Delhi UPSC Student Murder Case: फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड सिलेंडरवाला; नव्या प्रियकराला फ्लॅटमध्ये जिवंत जाळलं, लव्हस्टोरीचा भयानक शेवट

Delhi UPSC Student Murder Case: तूप, तेल अन् वाइन...फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थिनीने बॉयफ्रेंडला संपवलं; खोलीत नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?