Delhi Bus Girl Physical Harassment नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची (Nirbhaya Case) आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना (Delhi Bus Girl Physical Harassment) घडली. परी चौक ते कश्मीरी गेट या सुमारे 47 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान दोन आरोपींनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बसचा चालक आणि कंडक्टरला अटक केली आहे. सदर घटना 4 ऑगस्टच्या रात्री कश्मीरी गेट परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून ती इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेत आहे.

Continues below advertisement

रस्ता चुकल्याने स्लीपर बसमध्ये बसली विद्यार्थिनी- (Delhi Bus Crime News)

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कुटुंबीयांवर नाराज होऊन कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती. नोएडामध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत भावाकडे ती जात होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. याचदरम्यान एक रिकामी स्लीपर बस तेथून जात होती. विद्यार्थिनीने बस थांबवण्यासाठी हात केला. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने बस थांबवून तिला नोएडा सेक्टर-63 येथे जाण्याचे सांगत बसमध्ये बसवले.

चालक-कंडक्टरवर बलात्काराचा आरोप- (Delhi Bus Girl Physical Harassment Marathi News)

बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने पीडित विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर चालक आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशिरा कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोडवर विद्यार्थिनीला उतरवून तेथून फरार झाले.

Continues below advertisement

विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितली संपूर्ण घटना- (Delhi Bus Girl Physical Harassment Case)

घाबरलेल्या विद्यार्थिनीने कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिमारपूर येथील एका बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना अटक केली. घटनेत वापरलेली स्लीपर बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोपी बसला दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये घेऊन गेले होते. बसची दुरुस्ती झाल्यानंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात होते. त्याचदरम्यान परी चौक येथे त्यांना विद्यार्थिनी दिसली. परी चौक ते कश्मीरी गेट असा सुमारे 47 किलोमीटरचा प्रवास बसने केला. बस स्लीपर प्रकारची असल्याने आणि त्याला पडदे असल्याने बाहेरून बसच्या आतील भागात काय सुरू आहे, हे कोणालाही दिसले नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Buldhana Crime News: शस्त्राच्या धाकावर आदिवासी विवाहितेवर अत्याचार; तब्बल 40 दिवसानंतर दोन नराधमांना बुलढाणा पोलिसांकडून अटक