Dahisar Crime News : दहिसरमध्ये किरकोळ वादातून एका युवकाची चाकूने गळा कापून केली हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर बाईक पार्क करण्यावरून दोन्ही युवकांमध्ये होळीच्या दिवशी वाद झाला होता. याचाच राग मनात धरुन आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चाकूने आरोपीने एका युवकाची गळा कापून हत्या केली आहे. एम.एच.बी पोलिसांकडून आरोपीला तासाभरातच अटक करण्यात आली आहे. *

Continues below advertisement

घटनेमुळं परिसरात भीतीचे वातावरण 

दहिसर पश्चिम येथील गणपत पाटीलनगर गल्ली नंबर 5 मध्ये होळीच्या दिवशी घरा बाहेर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून आज एका युवकाची हत्या झाली आहे. सकाळी पावणे 11 वाजता दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर गल्लीत झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला आहे. मृत युवकाचे नाव भरत आढाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हत्या करणाऱ्या आरोपी कृष्णा राजा यादव याला एम.एच.बी पोलिसांनी अवघ्या 1 तासात केली अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास सुरु आहे. यापूर्वीही या परिसरात ट्रिपल मर्डरची घटना घडली होती. या घटनेमुळं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

खोपोली मधील भारत पेट्रोलियम कामगार कडून तरुणाला मारहाण

खोपोली मधील भारत पेट्रोलियम कामगार कडून तरुणाला मारहाण करून ती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावरुन मनसे अध्यक्ष सतिश येरुणकर आणि महाराष्ट्र सैनिक यांनी कामगारास चोप दिला आहे. कामगाराला माफी मागण्यास सांगितली. कामगाराने राज ठाकरे व महाराष्ट्राची माफी मागितली आणि पुन्हा परत असं होणार नाही असा शब्द मॅनेजरने दिला आहे. 

Continues below advertisement

दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला

ठाण्यातील मिरा रोड येथील काशीमीरा परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे. वाहतूक पोलीस किरण सहाणे हे अमर पॅलेस परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. यावेळी ही घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरुन जोरदार वाद सुरु झाला होता. सदर वाद मिटवण्यासाठी पोलीस किरण सहाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी एका दुचाकीस्वाराने संतापाच्या भरात सहाणे यांच्यावरच हल्ला करत त्यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.