Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महू जिल्ह्यातील अलीनगर येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांच्या मदतीने  उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सत्येंद्र महेंद्र खरवार (21) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. सत्येंद्र खरवार याच्यावर उत्तर प्रदेशात अनेक पोलीस स्टेशनमध्ये 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो अनेक महिन्यांपासून उत्तर प्रदेशातून फरार होता. या संशयिताला पकडून देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जारी करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आली आहे. हा संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून अंबड एमआयडीसीच्या (Ambad MIDC) एका खाजगी कंपनीत काम देखील करत होता. 


याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्यामधील वेगवेगळ्या पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये 9 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी सत्येंद्र हा मागील सहा महिन्यांपासून फरार होता. अथक प्रयत्न करुन देखील तो सापडत नसल्याने त्याच्यावर पोलीस उपमहानिरिक्षक आजमगढ, उत्तरप्रदेश यांनी 50 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 


उत्तर प्रदेशातील फरार गुन्हेगारास अटक


तो अंबड एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेशचे पोलिसांचे पथक चुंचाळे पोलिस चौकी येथे दाखल झाले. यानंतर चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार जनार्दन ढाकणे व अर्जुन कांदळकर यांनी शोध घेऊन अंबड औदयोगिक वसाहतीतील एका कंपनीतून त्याला ताब्यात घेतले. उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स टिमसह संयुक्त कारवाई करुन त्याला चुंचाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


'त्या' सफाई कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू


दरम्यान, शुक्रवारी रात्री हॅपी होली म्हणत अंगावर पेट्रोल टाकून सफाई कर्मचाऱ्याला एका मद्यपीने पेटवून दिले होते. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात ही घटना घडली होती. यात सफाई कामगार 60 टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान सफाई कर्मचारी विजय गेहलोत याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर काही तासातच आरोपी शुभम जगताप याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. 



आणखी वाचा 


Nashik Crime : गृहमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक हादरलं, जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर सपासप वार