Mumbai Crime News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडूप (Bhandup) परिसरात एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली असून यातील आणखी एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा देखील पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मुंबईच्या भांडूप (Bhandup) परिसरात राहते. तिच्यावर 2020 ते 22 जून 2022 या कालावधीत तीन लोकांकडून अत्याचार करण्यात आले. सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने तिच्यासोबत होत असलेल्या घटनेबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात (Bhandup Police Station) तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 62 वर्षे आणि 65 वर्षे वयाच्या दोन संशयितांना अटक केली. तर या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे.
पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 376, 376 (एबी), 376 (2, एन) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला व प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. परंतु, तिसरा आरोपी पोलिसांना सापडला नाही. सध्या तो फरार असून लवकरच त्याचा देखील शोध घेतला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर संशयित तिघे जण अत्याचार करत होते. परंतु, भीतीमुळे पीडितेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. परंतु, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने तिच्यासोबत होत असलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. परंतु, धीर धरत आईने मुलीकडून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि भांडूप पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरोधात तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधातही विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणातील दोघांना अटक केली. परंतु, एक जण पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्याला देखील लवकरच अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या