Dombivli Manapda Police : ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पीन, एमसील असे साहित्य वापरून एटीएम मधील रोकड चोरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकलयात. गस्तीवर असलेल्या मानपाडा पोलिसांच्या पथकाला मध्यरात्री गस्ती दरम्यान एका शटर बंद असलेल्या एटीएममधून ड्रील मशीनचा आवाज आला व चोरट्याचे बिंग फुटले. एमकॉम पर्यन्त शिक्षण घेतलेला राहुल चोरडिया अस या चोरट्याच नाव असून तो मध्यप्रदेश मधील इंदोर येथील राहणारा आहे. इंदोर मधील एका कंपनीबरोबर एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्याचे काढण्याचे काम करत होता मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग स्विकारल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मानपाडा पोलिसाचे पथक मानपाडा सर्कल परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान एका बँकेच्या एटीएम मधून ड्रिल मशीन चा आवाज आला एटीएमचे शटर बंद असताना आतून ड्रील मशीनचा आवाज आल्याने पोलिसांना संशय आला. सतर्कता दाखवत त्यांनी तत्काळ एटीएमचे शटर ठोठावले. त्याच वेळी आतून मशीनचा आवाज बंद झाला. पोलिसांचा संशय बळावला त्यानी एटीएमचे शटर उघडले असता आतमध्ये असलेल्या इसमाने पोलिसाना धक्का मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बगेत एटीएम फोडण्यासाठी लागणारे ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तू आढळल्या. पोलिसांनी हा इसम एटीएम मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लक्ष्यात आलं.
पोलिसांनी त्याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. राहुल चोरडिया अस या तरुणाच नाव असून राहुलने एम कॉम पर्यंत शिक्षन पूर्ण केलं आहे. राहुल मध्य प्रदेशातील सिस्को कंपनीत एटीएममध्ये पैसे भरण्याचे काढण्याचे काम करत होता मात्र मिळणारा पगार परवडत नसल्याने हे काम सोडून त्याने चोरीचा धंदा स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुल ने महराष्ट्रसह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने फोडून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे.