एक्स्प्लोर

Paithan Accident : भीषण अपघात! पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची धडक, बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी अंत

Paithan Accident : पैठण येथे अरुंद रस्त्यावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.

Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पैठण येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. पैठण (Paithan Accident News) येथे अरुंद रस्त्यावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Chhatrapati Sambhajinagar Accident) झाला. यात दुचाकीवरील बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक भालेराव, कृष्णा गायकवाड आणि ऋतुजा ऊर्फ छकुली कृष्णा गायकवाड अशी मृतांची नाव आहे. (Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident News)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. यावेळी रुग्णवाहिकेच्या मदतीने तिन्ही मृतदेह पैठणच्या शासकीय वैद्यकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्रात हलवण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपघातातील एसटी बस आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

Malegaon Accident: मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाचा घाला; एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले

मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे सातवडे धरणात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या भूषण रघुनाथ कर्नर (वय 13) याचा पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडाला. तर भूषणला वाचवण्यासाठी गेलेले हरी बाबू गोयेकर (वय 28) हे देखील पाण्यात बुडाले. ही घटना पाहून मदतीसाठी धावून गेलेले बाबू गुथा गोयेकर (वय 54) यांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने कजवाडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik Crime: येवल्यात आयशरची उभ्या ट्रकला जोरदार धडक; अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी..

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात देखील असाच एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येवला शहरातील लक्ष्मी माता ते नागड दरवाजा रोडवरील पिंजर गल्ली परिसरात आयशर टेम्पोने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक आणि पुढे उभी असलेली ओम्नी कार फरफटत गेली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. जखमी रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याने वाहने हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री,  पवई पोलिसांची मोठी कारवाई, 4500 लिटर डिझेल जप्त, तीन आरोपींना अटक
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
SBI Data Leak : स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांचा पत्ता, कर्ज, संपर्क यासह मोठा डेटा लीक, सर्व्हरवर सायबर हल्ला, तब्बल एका महिन्यानंतर नवी मुंबईत गुन्हा दाखल
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget