Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात, क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वरवाडी परिसरात मध्यरात्रीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाकडून तरुणीला रस्त्यावरून ओढत नेत असल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत असून, तरुणी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे.

Continues below advertisement

सदर व्हिडीओ 31 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांचा असून, परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वर्दळ नव्हती. सुमारे 10 ते 15 मिनिटे हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता. अखेर एका जागरूक नागरिकाने खिडकीतून आवाज दिल्यानंतर तरुण आणि तरुणी तेथून निघून गेले. त्यामुळे हे तरुण-तरुणी नेमके कोण, त्यांचं नातं नेमकं काय? एवढ्या रात्री दोघेही रस्त्यावर काय करत होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत आहेत. पोलिसांमध्ये सदरील प्रकरणांमध्ये अद्याप कुठलीही तक्रार दाखल नाही. एबीपी माझाकडे हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाठवला मात्र पोलिसांनी स्वतःहून काहीही दखल घेतली नाही.

पुण्यातील घटनेनेही महाराष्ट्र हादरला- (Pune Crime News)

जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे (Pune Crime News) रूपांतर भयंकर घटनेत झालं. मित्रानेच मित्रावर थेट कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केलं. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कात्रज परिसरात घडली. या घटनेचा सीसीटीव्ही (Pune Crime News) समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील जखमी तरुणाचे नाव चेतन चव्हाण असून, हल्ला करणाऱ्या आरोपी आदित्य कांबळे याला अटक करण्यात आली आहे. आदित्य आणि चेतन हे दोघेही चांगले मित्र होते. दोघे ही २ तारखेला भेटले, जुन्या मैत्रिणीचा (Pune Crime News) विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन लावायचा की नाही, यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तुझ्यामुळे ब्रेकअप झाला असं एक मित्र म्हणाला आणि त्याने थेट बाजूला असलेल्या रसवंती गृहात ठेवलेल्या कोयत्याने मित्रावर वार केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

ही बातमीही वाचा:

Pune Crime News: मित्रामुळेच आपला ब्रेकअप झाल्याचा संशय; भेटल्यानंतर तिला फोन लावण्यावरून दोघांचा टोकाचा वाद; कोयत्याने सपासप वार अन्..., पुण्यातील हादरवणारा व्हिडीओ