Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात जिल्ह्यातील मांडकी गावात (Mandki Village) एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. यात एका व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Videos) एक गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. तसेच शिपाई त्याला ही मारहाण करत आहेत. हा व्हिडीओ (Videos) पाहून अंगावर शहारे येतात आणि संतापही. या बिचाऱ्या मुलाला त्याच्या वेदना ही सांगता येत नाहीत. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात (Chhatrapati Sambhajinagar News) हा प्रकार घडला आहे. या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar News : केअरटेकरकडून विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ हाच प्रकार नाही तर या विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे याने देखील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचं आरोप करण्यात आलं आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत आहेत.

Continues below advertisement

विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप

दरम्यान, मतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेली ही अमानुष वागणूक समाजाच्या मनाला हादरा देणारी आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान हा प्रकार समोर कसा आला आणि याबाबत सर्वात आधी प्रशासनाकडे तक्रार करणारे प्रतिम घंगाळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिव्यांग आयुक्तांना हा व्हिडीओ पाठवला, मग सगळी सूत्र हलली. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, या प्रकरणी दिव्यांग आयुक्तांलयाकडून 28 सप्टेंबरला चौकशीचे आदेश दिले आहे. याची कुणकुण लागताच संस्थाचालक जागे झाले आणि स्वतःहून 30 तारखेला चिखलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मग प्रश्न हा पडतो की एवढ्या दिवस संस्थाचालक काय करत होते.

आणखी वाचा