Chhatrapati Sambhajinagar News:छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका कापड दुकानातील आकर्षक सूट जाहीर केल्याने मोठी झुंबड उडाल्याची घटना घडली होती. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सूट जाहीर केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस (Chhatrapati Sambhajinagar Police) अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत जवाहरनगर पोलीस ठाण्यात दुकान मालक कृष्णा रघुनाथ देशमुख आणि संजय ललवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवहागुन्हादाखलकरण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची दखल घेतली असून, संबंधित दुकान मालकांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Chhatrapati Sambhajinagar : साड्यांची ऑफर महिलांना पडली चांगलीच महागात, तिघींना गुदमरून चक्कर 

Continues below advertisement

छत्रपती संभाजी नगर शहरात स्वस्त साड्यांची ऑफर महिलांना चांगलीच महागात पडली. पाच हजारांची साडी केवळ 199 रुपयांमध्ये मिळत असल्याने महिलांची तोबा गर्दी दुकानात उसळली. महिलांनी एकच गर्दी केल्याने त्यातील तिघींना गुदमरून चक्कर आली. शेवटी शटर बंद करून पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

Chhatrapati Sambhajinagar : नेमकंप्रकरणकाय?

मकर संक्रांति निमित्त शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानात महिलांकरता विशेष ऑफर देण्यात आली. ही विशेष ऑफरची जाहिरात समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे केवळ संभाजीनगरच नाही तर जालना, वाशिम, परभणी, नांदेडसह इतर जिल्ह्यातील महिलांनी दुकानाबाहेर गर्दी केली. दुकानात जाण्यासाठी एकच शटर होते. एकाच वेळी सर्व नागरिक आत गेल्याने उभे राहण्याची जागा देखील नव्हती. ग्राहकांनी दुकानात गेल्यानंतर प्रत्येक वस्तू उचलून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. दुकानाबाहेर चपला बुटांचा खच पडला होता. रविवारी या दुकानाबाहेर ही परिस्थिती दिसून आली. तर महिलांनी अर्धा किलोमीटर खरेदीसाठी रीघ लावली. खबरदारीचा उपाय म्हणून दुकानाबाहेर दुकान मालकाला अक्षरशः बाउन्सर उभे करावे लागले. कमी पैशांमध्ये साड्या मिळत असल्याने जीवाची हेळसांड करून गर्दी केल्याचं महिलांनी मान्य केलं.

केवळ महिलाच नाही तर पुरुषांचे देखील कपडे स्वस्त मिळत असल्याने तितक्याच संख्येने पुरुषांची गर्दी काल पाहायला मिळाली. जीवावर बेतून केल्या जाणाऱ्या या खरेदीची चर्चा केवळ संभाजीनगरच नाही तरी इतर ठिकाणी देखील रंगू लागली आहे.

आणखी वाचा