Chhatrapati Sambhajinagar Fire News :छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये (Asian Hospital) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच NICUमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली असून आगीच्या वेळी NICUमध्ये 9 बालकं उपचार घेत होती. तर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. (Chhatrapati Sambhajinagar Fire Accident in Hospital)
Chhatrapati Sambhajinagar Fire : अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न, अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण
दरम्यान, आग लागल्याचं समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. सर्व 9 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा धोका टळला.
Chhatrapati Sambhajinagar Fire Accident : 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
महत्त्वाचं म्हणजे, ज्या पहिल्या मजल्यावर NICU आहे, तिथे एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये 8 NICUतील बालकं, जनरल विभागातील 36 आणि स्पेशल रूममधील 13 रुग्णांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार सर्व रुग्णांना सुरक्षितपणे हलवण्यात आलंय. बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर जवाहरनगर पोलीस आणि आरसीपीच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. वेळीच मिळालेली माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धावपळ. यामुळे एशियन हॉस्पिटलमधील 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र यां घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Fire Accident in Hospital: नागरिकांमध्येचिंतेचंवातावरण
दरम्यान, अलीकडेचअमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत (Amravati Fire news) तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशू कक्षात (SNCU) व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली आणिमग ही आग (Fire news) वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा या कक्षात 9 बालके होती. मात्र, तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडेही दुदैवी घटनाघडलीअसतातानाच छत्रपती संभाजीनगरच्याहॉस्पिटलमध्येदेखीलअशीचआगीचीघटनाघडल्यानेअनेकप्रश्ननिर्माणझालेअसूननागरिकांमध्येहीचिंतेचंवातावरणआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
