एक्स्प्लोर

 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले

Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये (Asian Hospita) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये (Asian Hospital) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच NICUमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली असून आगीच्या वेळी NICUमध्ये 9 बालकं उपचार घेत होती. तर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. (Chhatrapati Sambhajinagar Fire Accident in Hospital)

Chhatrapati Sambhajinagar Fire : अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न, अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण

दरम्यान, आग लागल्याचं समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. सर्व 9 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा धोका टळला.

Chhatrapati Sambhajinagar Fire Accident : 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

महत्त्वाचं म्हणजे, ज्या पहिल्या मजल्यावर NICU आहे, तिथे एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये 8 NICUतील बालकं, जनरल विभागातील 36 आणि स्पेशल रूममधील 13 रुग्णांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार सर्व रुग्णांना सुरक्षितपणे हलवण्यात आलंय. बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर जवाहरनगर पोलीस आणि आरसीपीच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. वेळीच मिळालेली माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धावपळ. यामुळे एशियन हॉस्पिटलमधील 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र यां घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Fire Accident in Hospital: नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

दरम्यान, अलीकडेच अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत (Amravati Fire news) तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशू कक्षात (SNCU) व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली आणि मग ही आग (Fire news) वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा या कक्षात 9 बालके होती. मात्र, तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे ही दुदैवी घटना घडली असतातानाच छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये देखील अशीच आगीची घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget