Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये झालेल्या कीर्तनकार महिलेच्या हत्येचा उलगडा आता झाला आहे. मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोन शेतमजुरांनीच या कीर्तनकार महिलेचा खून केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे . वैजापूरमध्ये कीर्तनकार हभप संगीताताई महाराज यांना आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (28 जून)घडला होता . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती . (Crime News)
सोने घेऊन पळून जायचा प्लॅन, पण संगिता महाराज उठल्या अन्...
कीर्तनकार संगीताताई महाराज ज्या मंदिरात राहत होत्या तिथल्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर सोनं असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती . मात्र तिथे चोरी करण्यासाठी लॉक तोडत असताना महिला कीर्तनकार उठल्या .आणि आरोपीला पाहिलं .याची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपींनी तिला दगडाने ठेचून ठार केलं अशी कबुली दिली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष चव्हाण आणि अनिल बिलाला असे आरोपींचे नाव आहे .यातील एक आरोपी महालगाव परिसरात पकडला असून दुसऱ्याला MP बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे .चोरी करून सोने घेऊन पळून जायचा या आरोपींचा प्लान होता .त्यांच्या ताब्यातून काही मुद्देमाल हस्तगत केला असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सांगितला आहे .
जीवे मारण्याची धमकी
या घटनेच्या तपासात काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार मृत कीर्तनकार संगीताताई पवार यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती .वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली होती .जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं .मी एकटी राहते मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचेही त्या म्हणाल्या होत्या . आश्रमासाठी घेतलेल्या जागेच्या वादावरून शेजाऱ्यांशी भांडण झाल्याने ही धमकी आल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं .28 जून रोजी कीर्तनकार महिलेला अज्ञातांनी दगडाने ठेचून मारल्याचा प्रकार समोर आला होता . आता चोरी करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोन शेतमजुरांनी महिला कीर्तनकार संगीता ताई पवार यांना मारल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे . या शेतमजुरांचा आणि धमकीच पत्राचा काही संबंध आहे का ? हे अद्याप अस्पष्ट आहे .
हेही वाचा