Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे .खाजगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासच्या 45 वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापचनाक घटना आज (दि 15 जून) सकाळी उघडकीस आली आहे . या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरलाय .

Continues below advertisement

सुभाष जाधव (45)  असे आरोपी शिक्षकाचे नाव असून दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस नावाने आरोपीची शिकवणी आहे . तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत नराधमाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला . आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे .

नेमके घडले काय ?

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये  45 वर्षीय शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे . सुभाष जाधव असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनी मध्ये टॉपर क्लासेस या नावाने आरोपीची शिकवणी आहे .एम ए इंग्रजी एम एड असलेल्या सुभाष जाधव कॅनराधमासह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती .तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केला .

Continues below advertisement

हा सर्व प्रकार घरी सांगितलास तर .. 

नराधमाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार घरी सांगितलास तर आई-वडिलांचे तुकडे करेन अशी धमकी दिली .घाबरलेल्या मुलींना क्लासला जायचं बंद केलं .मुलगी क्लासला जात नसल्याने आई-वडिलांनी विचारपूस केली असता मुलीने सर्व हकीकत आपल्या पालकांना सांगितली . आपल्या मुली सोबत झालेला प्रकार समजतात मुलीच्या नातेवाईकांनी नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे .याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली असून नराधमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

नाशिकमधील पत्नीने पतीला मारून शौचालयाच्या खड्ड्यात लपवलं

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुंटविहिरजवळील मालगोंदा गावात एका विवाहित महिलेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव यशवंत मोहन ठाकरे (वय अंदाजे 35) असून, या प्रकरणी त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.