छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर आई, वडील आणि १९ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर संपूर्ण चांदगुडे कुटुंब क्षणात (Chhatrapati Sambhajinagar News) उद्ध्वस्त झाले. या सामूहिक मृत्यू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या घटनेमागील धक्कादायक आणि संवेदनशील माहिती समोर येत आहे. सुरुवातीला (Chhatrapati Sambhajinagar News) मुलाने आयफोनच्या हट्टापायी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि समोर आलेल्या पुराव्यांवरून या शोकांतिकेचे मूळ 'कौटुंबिक कलह' असल्याचे उघड झाले आहे.(Chhatrapati Sambhajinagar News)

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar : वेगवेगळे अंत्यसंस्कार; नातेवाईकांमधील वाद चव्हाट्यावर

तिघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-mortem) झाल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पती मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी मूळ गावी (पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) नेऊन अंत्यसंस्कार केले, तर पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचे मृतदेह मुकुंदवाडी येथील संगीता यांच्या माहेरी नेऊन तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत, यावरून कुटुंबातील अंतर्गत दुरावा स्पष्ट झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: जमिनीचा वाद ठरला वादाचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या नावावर असलेली काही जमीन आपल्या तीन मुलींच्या (कुणालच्या आत्यांच्या) नावे केली होती. या जमिनीच्या हस्तांतरणावरून पती मुरलीधर आणि पत्नी संगीता यांच्यात सातत्याने वाद होत होते. याच कौटुंबिक वादामुळे संगीता आणि मुलगा कुणाल हे मूळ गावी जाणे टाळत असत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar News: 'माझ्या संसाराची राखरांगोळी केली'; यूट्यूब व्हिडिओ चर्चेत 

संगीता चांदगुडे या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय होत्या. त्यांच्या 'संगीता चांदगुडे' या यूट्यूब चॅनेलचे तब्बल २८ हजार सबस्क्रायबर्स असून त्यांनी उखाणे व महिलांविषयक १६७ व्हिडिओ अपलोड केले होते. या घटनेनंतर त्यांनी यूट्यूबवर शेअर केलेले काही जुने व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात त्यांनी घरातील त्रासाचा पाढा वाचला आहे. "नातेवाईकांनी संपत्ती आणि पैशांच्या लोभातून माझ्या पतीला आपल्या बाजूला वळवून घेतले. माझ्या संसाराची राखरांगोळी केली आणि मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर करून त्याच्या शिक्षणात अडथळे आणले," असे गंभीर आरोप त्यांनी या व्हिडिओंमधून केले होते.

Chhatrapati Sambhajinagar News: मानसिक तणावात होता मुलगा कुणाल

मुरलीधर हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त ते अनेकदा १५ दिवस ते महिनाभर घराबाहेर असायचे. घरात आई-वडिलांमध्ये होणारे सातत्यपूर्ण वाद आणि वडिलांविषयी मनात असलेली नाराजी यामुळे १९ वर्षांचा मुलगा कुणाल प्रचंड मानसिक तणावाखाली जगLocation होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून कौटुंबिक तणाव आणि आर्थिक वादाच्या सर्व बाजू तपासत आहेत.