Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमात सर्व काही क्षम्य असतंआपणहेकायमऐकतअथवावाचतअसतो. असाचकाहीसाप्रकारछत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाआहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचेसमोर आलंआहे. 19 वर्षीय तरुणीनं चक्क आपल्या आईचे 11 तोळे दागिने आणि एक लाख 55 हजारची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामीप्रेमातबुडालेल्या प्रेयसीनेहेकृत्यकेलंआहे. ही घटना शहतील भारतनगर, एन 13, हडको भागात घडली. मंगेश विलास पंडित आणि 19 वर्षीय तरुणी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तर मंगेशसह त्याचा मित्र कुणाल केरकर यांना बेगमपुरा पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.
मिळालेल्यामाहितीनुसार, 58 वर्षीय महिला या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. शनिवारी सकाळी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने आईकडे वापरण्यासाठी सोन्याची अंगठी मागितली. तेव्हा महिलेने कपाटात पहिले तेव्हा दागिन्यांच्या सर्व डब्या रिकाम्या दिसल्या. तसेच 1 लाख 55 हजाराची रोकड देखील गायब असल्याचे दिसून आले. यावेळीतरुणीला विचारपूस केली असता तेव्हा तिने सर्व दागिने दोन महिन्यापूर्वीच रुमालात गुंडाळून दिल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला मोठा धक्का बसला. तिने सोमवारी (दि.11) बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सध्यायाप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.
प्रियकराला प्रेयसीने घरातले नेमके कोणते दागिने दिले?
प्रत्येकी 24 आणि 21 ग्रामच्या 2 चैन, 3 ग्रामची कानातील रिंग, 10 ग्रामचे सोन्याचे नाणे, प्रत्येकी 10 ग्रामच्या 3 अंगठ्या, 4 ग्रामचे सोन्याचे पदक, अडीच ग्रामची रिंग, 2 ग्रामची अंगठी, सोन्याच्या 3 ग्रॅमच्या बाळ्या, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, 10 ग्रामचे कानातले जोड, चांदीची अंगठी आणि 1 लाख 55 हजार रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितआरोपीनेतरुणीकडे पैशाची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. प्रेमात वेडी झालेलया तरुणीने स्वतःच्या आईचे दागिने रुमालात गुंडाळले. एका रात्री तिने दोरी बांधून बकेटमध्ये दागिने टाकून खाली सोडले. ते दागिने संशयितआरोपीने त्याचा मित्र कुणालच्या मदतीने घेतले होते. त्याने दागिन्यांचे काय केले हे अजूनही समोर आलेले नाही. सध्यापोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. मात्रयाघटनेनेपरिसरातएकाचखळबळउडालीआहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
