Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात पोलिसांच्या भरोसा सेल इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. समुपदेशन संपल्यानंतर भरोसा सेलच्या गेटवर सासऱ्याने जावयावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे.
अर्जदार नावेद मुसाख पठाण राहणार रोजेबाग यांच्यावर त्यांचे सासरे नदिम शेख यांनी चाकूने हल्ला केला. यामध्ये नावेद व त्यांचा तीन ते चार वर्षाचा मुलगा त्यांच्याजवळ होता. त्यालाही दुखापत झाली आहे. ही घटना तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही घटना भरोसा सेलच्या गेटवर घडली आहे. या कार्यालयामध्ये पूर्वी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते. परंतू, आता त्या ठिकाणचे सुरक्षा रक्षक काढल्यामुळे या ठिकाणी समूहिशेसाठी येणाऱ्यांचे येणाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशाच पद्धतीने हा कुठेतरी चाकू हल्ला झाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
Thane Crime News: एकनाथ शिंदेंच्या शाखेत आई अन् मुलाकडून चॉपर हल्ला; काहीजण जखमी, ठाण्यातील धक्कादायक घटना