Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात महाराज असल्याचे सोंग घेत चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य संशयित ‘गोट्या महाराज’ उर्फ परमेश्वरानंद हा पसार झाला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Crime news)

Continues below advertisement


प्रकरण उघडकीस कसे आले?


स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली होती की, दुचाकीवरून गांजाची विक्री करण्यासाठी एक तरुण साताऱ्यात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून जवळपास 385 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने कबुली दिली की, हा माल तो ‘परमेश्वरानंद महाराज’ यांच्याकडून आणतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गेवराई बुद्रुक परिसरातील डोंगर गाठला. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना जनावरांच्या गोठ्यात 30 किलो गांजा सापडला. पोलिसांनी हा साठा जप्त करून गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच संशयित ‘गोट्या महाराज’ पसार झाला.


गोट्या महाराजां’चा शोध घेण्यासाठी विशेष पथक


परमेश्वरानंद उर्फ गोट्या महाराज हा डोंगर परिसरात वास्तव्यास असून, तिथे तो जनावरं पाळतो, सेंद्रिय खताची निर्मिती व विक्री करतो. मात्र याच कामाच्या आडोशाला तो गांजाची लागवड आणि विक्री करत असल्याचं उघड झालं. पोलिसांच्या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणाची ओळख लहू बंडूबा मोरे (वय 25, रा. सिंदोर) अशी झाली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच मोठा साठा पोलिसांनी उघडकीस आणला. सध्या पसार झालेल्या ‘गोट्या महाराजां’चा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.


11 जणांनी केली प्रियकराची हत्या, गुन्हा दाखल


 पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नात्यातील एका मुलीच्या 26 वर्षीय प्रियकराला 11 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना 22 जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मृत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 


हेही वाचा 


आरोपीचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला; पोलिसांनी थेट एन्काऊंटरच केला; 4 पोलीस जखमी, साताऱ्यात खळबळ