Chhatrapati Sambhajinagar Crime : सोन्याचे भाव (Gold Rate) वाढलेले असतानाच फसवणुकीचा नवा फंडा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) समोर आला आहे. 93 हजार 24 कॅरेट सोनं खरेदी करा आणि ते एक लाख रुपये तोळा विका. 7000 चा नफा कमवा, अशी फसवणुकीची जाहिरात करणे एकाला महागात पडले आहे. पोलिसाच्या तपासात 24 कॅरेटमध्ये चांदी मिक्स करून लोकांची फसवणूक करत असल्याचा समोर  आलं . या व्यापाऱ्याकडून फसवा-फसवीची जाहिरात रीलस्टारच्या मदतीने करण्यात आली. आणि तो व्हिडिओ व्हायरल देखील करण्यात आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी (Police) व्यापारी आनंदकुमार मगरे, रील स्टार सुशील प्रभू वाघमारे, दीपक गौतम आढावे आणि जयपाल कन्हैयालाल धर्मानी या चौघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आनंदकुमार मगरेला जयपाल धर्मानी याने सोने विक्रीबाबत एक योजना सांगितली. त्यासाठी मगरेने दीपक आढावे याला आपल्या सोबत घेतले. नारळीबाग येथील स्वतःच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर दोघांनी ‘आशीर्वाद गोल्ड’ या नावाने ऑफिस सुरू केले. त्यांनी अशी योजना आखली की, 24 कॅरेट सोने खरेदी करून त्यामध्ये चांदी मिक्स करून 22 कॅरेट सोने हे ग्राहकांना 24 कॅरेट म्हणून विक्री करू. 22 कॅरेट सोने हे आपल्याला 9 हजार 100 ग्रॅमच्या भावाने मिळेल. ते आपण ग्राहकांना 9 हजार 300 रुपये ग्रॅमने विक्री करू. ग्राहकाने ते विकले की, त्याला 10 हजार रुपये ग्रॅम मागे भेटतील. म्हणजेच त्याचा फायदा हा 700 रुपये ग्रॅम मागे होईल. परंतु, त्यास सोने हे 22 कॅरेट आहे, असे सांगायचे नाही, अशी योजना आखण्यात आली. 

3 हजारांसाठी रील बनवली 

रीलस्टार सुनील बाघमारे याने 3 हजार रुपये घेत ‘आशीर्वाद गोल्ड’ ची जाहिरात केली. या जाहिरातीतून लोकांची फसवणूक होईल, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस तपासात हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.  यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime news: मुंबईत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग

Sanjay Gaikwad and Eknath Shinde: शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेच गायब, संजय गायकवाडांचा भगव्या शालीतला एकच मोठा फोटो, नाराजीच्या चर्चांना उधाण