Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल (21 ऑगस्ट) घडली.  कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Marathi News)

Continues below advertisement

कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. 

आई आणि लेकाचा काळीज चिरणारा शेवटचा संवाद- (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

पोलीस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं.

Continues below advertisement

पोलीस काय म्हणाले? (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Marathi News)

सदर घटनेवर पोलीस म्हणाले की, आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. त्याची आईही समोर बसून त्याला समजावत होती. मुलाचे मनपरिवर्तनही होत होते. मात्र त्या गर्दीमधून वडील आहे, ते वडील होते, हे पोलिसांना माहिती नव्हते. वडील अचानक डोंगरावर आले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोल गेल्यामुळे मुलासह त्यांचाही खाली पडून मृत्यू झाला. आईने हे बघताच तिनेही त्यांच्यामागून तात्काळ डोंगरावरुन उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातमी:

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती