Chhatrapati Sambhajinagar : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघात कार 100 फूट फरफटत गेली, बचावकार्य करताना मोठा स्फोट, एकाचा आगीत होरपळून जागीच अंत
Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. जांबरगाव शिवारात भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय.

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) एक भीषण अपघात (Accident News) घडला आहे. जांबरगाव शिवारात भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. हि धडक इतकी भीषण होती कि धडकेनंतर कार तब्बल 100 फूट फरफटत (Accident News) गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपघातास्थळी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात कारमधील दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चालकाचे पाय अडकले असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. (Chhatrapati Sambhajinagar Accident News)
Chhatrapati Sambhajinagar Accident : बचावकार्य करताना मोठा स्फोट, एकाचा आगीत होरपळून जागीच अंत
दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच कारने अचानक पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. या आगीत चालक पवन अजमेरा (वय 52) यांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात ईशा अजमेरा आणि विना अजमेरा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताने परिसरत एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Gadchiroli News : रुग्णालयाचा उपचार नाकारून पुजाऱ्याकडे उपचार, आई आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू गडचिरोली जिल्ह्यातील घटना
अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका कुटुंबाच्या निर्णयामुळे गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात समोर आली आहे. कोरची तालुक्यातील हुडुकदुमा येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून पुजारी कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरची तालुक्यातील हुडूकडुमा येथील रहिवासी रमुला काटेंगे (24) ही गर्भवती होती. 11 एप्रिल रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावत तिला घरी नेले. त्यानंतर उपचारासाठी छत्तीसगडमधील एका पुजाऱ्याकडे गेले. तेथे करण्यात आलेल्या अघोरी उपचारांमुळे तिची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे 13 एप्रिल रोजी तिला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारास विलंब झाला आणि रक्तदाब वाढल्याने प्रसूती दरम्यान माता आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात अशा घटना सतत घडत असल्याने या घटनेमुळे अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 700 पुजाऱ्यांना आरोग्य दूत म्हणून नियुक्ती करून त्यांना मानधनही सुरू केले आहे. मात्र याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे या घटनेवरून समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















