Chhatrapati Sambhajinagar Accident News: छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता कि या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर रिक्षात अडकलेल्या रिक्षा चालकाला अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बाहेर काढले. दरम्यान या अपघातात रिक्षा चालकासह 2 जण ठार झाल्याची माहिती आहे, तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. सोमवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
Accident News: रिक्षाचा अक्षरशः चुराडा, चालकासह दोघे जागीच ठार, तर दोघे गंभीर
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींवर रुग्णलायत उपचार करण्यात येत आहे. तर यात रईस हासिम शेख (रिक्षा चालक, वय 35वर्ष अंदाजे रा. रांजणगाव , छ. संभाजीनगर), रुक्मिणी येणगे (वय 45 वर्ष अंदाजे, प्रवासी) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर शितल मोरे (वय 24 वर्ष अंदाजे) पायल वरदे (वय 19 वर्ष अंदाजे, रा. शिवनेरी कॉलोनी, रांजणगाव, वाळूज MIDC) या दोघी जखमींची प्रवासी व्यक्तीची नावे आहेत. मात्र अपघाताचे नेमकं कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Bhandara Accident News: तुमसर रोडवर वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं...एकाचा जागीच मृत्यू...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड (देव्हाडी) ते रामटेक मार्गावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक गोंदियाच्या दिशेने जात होता. याच दरम्यान स्टेशन टोली येथील रहिवासी दयाराम पुनाजी मोहरकर हे आपल्या दुचाकीने जात असताना, ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दयाराम मोहरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Pune News : बाईकची एक छोटी टेस्ट रायड घेऊन येतो” असे सांगून एक जण पसार, व्यवसायिकाची फसवणूक
पुण्यातील सैय्यद नगर परिसरात सेकंड-हँड वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकाच्या वेशात आलेल्या एका चोरट्याने दोनचाकी वाहन घेऊन पोबारा केलाय.
व्यावसायिकाने 1.40 लाख रुपयांत व्यवहार अंतिम केला होता. चोरट्याने “बाईकची एक छोटी टेस्ट रायड घेऊन येतो” असे सांगून वाहन घेतले; मात्र त्यानंतर तो पसार झाला. बराच वेळ उलटल्यानंतरही आरोपी परत न आल्यानं व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. कळेपडळ पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
ही बातमी वाचा: