Chhatrapati Sambhajinagar Murder : छत्रपती संभाजीनगर शहर दिवाळीच्या दिवशी हादरले असून रामनगर भागात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचं समोर आलं. विपुल चाबुकस्वार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे असे हत्या करणाऱ्यांची नावं आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
आरोपी आशिष चौतमलने चाकू भोसकताना CCTV समोर आला आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Murder : बोलता बोलता चाकूने वार
मयत झालेला विपुल चाबुकस्वार हा त्याच्या मित्रांना, म्हणजे आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे यांना भेटायला गेला होता. सुबोध दहाडे हा रिक्षामध्ये बसला होता तर आशिष आणि विपुल हे रिक्षाबाहेर एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी आशिषने सुरा काढला आणि विपुलच्या छातीत तो भोकसला.
वार झाल्यानंतर काही सेकंद विपुलला काहीच समजले नाही. त्यानंतर तो खाली पडला आणि जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला. ही हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही नोंदवला आहे. ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
Solapur Crime : सोलापुरात पतीने केली पत्नीची हत्या
सोलापुरातल्या न्यू बुधवार पेठ परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडला आहे. यशोदा सुहास सिद्धगणेश असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुहास सिद्धगणेश आणि यशोदा सिद्धगणेश यांच्यात घरगुती वाद झाला होता. या वादातून सुहास याने पत्नी यशोदा हिला जबर मारहाण केली. इतकंच नाही तर चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यामध्ये यशोदा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली. तेव्हा आरोपी सुहास याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
शेजारी असलेल्या लोकांनी घरात जाऊन पहिल्यानंतर यशोदा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सुहास सिद्धगणेश याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा: