Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरात कायद्याचा रक्षकच गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर याच्याविरोधात एका विवाहित महिलेने लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत लग्नाचं आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. (Crime news)

Continues below advertisement

तक्रारदार महिलेनुसार, चार वर्षांपूर्वी तिची पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांच्याशी मैत्री झाली. 15 जुलै रोजी आरोपीने महिलेला कारमध्ये बसवून मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला आणि निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime news: केतन-सियाच्या साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यातील साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात  या दोघांचा साखरपुडा झाला होता. 18 जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Pune news: पुण्यातील घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील घायवळ टोळीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात घायवळ टोळीकडून एकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. निलेश घायवळविरोधात तक्रार दिल्याच्या रागातून मोबाईल शॉप चालकावर घायवळ टोळीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. कर्वे रोडवरील कोकण एक्सप्रेस हॉटेलसमोर अमित शिंदे याच्यावर कोयत्याने  वार करत त्याच्यावर  हल्ला केला होता. मंगळवारी सायंकाळी दुकानाबाहेर उभे असताना 8 ते 10 जणांनी हल्ला केला होता. या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Akola Crime news: अकोल्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश

अकोला पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत 2 तरुणींसह तीन जणांना पकडलं. अकोला शहरातील सिव्हिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम नगर परिसरात ही कारवाई करण्यात आलीये. अपार्टमेंटमधील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हा देह विक्रीचा व्यवसाय चालयाचा. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत ही कारवाई केली. प्रति ग्राहकांकडून 5 हजार रुपये घेत या तरुणी आणि महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत होते. व्हॉट्सअ‍ॅपवर तरुणींचे फोटो पाठवून पूर्ण सौदे ठरायचे. मात्र, रात्री स्थानिक पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. जवळपास 2 तास घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी होती.

आणखी वाचा

राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल