Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून (Crime News) केल्याची घटना घडली आहे. सोबतच त्याने लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन खून केल्या त्यानंतर प्रेत शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा ही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांना ही घटना माहिती होताच पोलिसांनी मारेकर्याला अटक केली आहे. मोनिका ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करत होती. तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे.
पार्किंगच्या निमित्याने प्रेम जडलं, पुढं आक्रीत घडलं
दरम्यान, या पार्किंगवर काम करीत असलेल्या शेख याच्यासोबत तिचे वर्षभरापासून संबंध जोडले होते. 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही. त्यामुळे आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाचे चक्र फिरवली आणि तपास सुरू केला. अशातच तपासात आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. याप्रकरणी आता कदीम जालना पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ परिसरात पसरली आहे.
गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण
छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने एका महिलेचे प्राण वाचले आहे. 14 फेब्रुवारीला सकाळी 9. 27वाजाताच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर नियमित गस्त चालू असताना गाडी क्रमांक 12072 जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला बानोबी शेख रशीद या सोडण्यासाठी आल्या होत्या.
दरम्यान, अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या. गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन त्या खाली पडल्या. मात्र त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलीस अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर आणि अश्रुबा गेजगे यांचे लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेन खाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही. त्यानंतर महिलेला सुरक्षित यांचे नातेवाईकाचे ताब्यात देण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
