Chandrapur Farmer Sold Kidney Case : कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी (Kidney) विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला होता. या प्रकरणानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान या गंभीर प्रकरणाच्या चौकशी आता तामिळनाडूच्या त्रिची येथील हॉस्पिटलमधून एक ते दीड कोटीला किडनी विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासातून हि माहिती समोर आली असून या प्रकरणाचे जाळे आता देशभर पसरले आहे कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Continues below advertisement

दरम्यान, किडनी विकणाऱ्या पीडित व्यक्तीला अवघे 5 ते 8 लाख रुपये मिळत असल्याचीही माहिती आहे. भारतातील किडनी डोनर रॅकेटचा पहिला किडनी रिसिव्हर बंगळुरूत सापडला आहे. तर आरोपी डॉक्टरांनी हवालाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये देशातून बाहेर पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात (Chandrapur Farmer Sold Kidney Case) स्थानिक गुन्हे शाखेला मोठी माहिती मिळाली असून पोलीस त्या दिशेनं आता तपास करत आहे.

Kidney Sold Case : किडनी स्वीकारणारा पहिला व्यक्ती पोलिसांसमोर हजर

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेद्वारे काढलेली किडनी स्वीकारणारा पहिला व्यक्ती पोलिसांना निष्पन्न झाला असून तो काही दिवसांत चंद्रपूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा कर्नाटकची राजधानी बेंगलुरुशी थेट संबंध असल्याचे समजतय. पोलिसांच्या तपासा दरम्यान उत्तर प्रदेशातून पोलिसांच्या हाती लागलेला किडनी पीडित मोहम्मद तारीक खान (३६, रा. लखनौ) यांची किडनी त्रिची येथे काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदसामी यांनीच केल्याचे तारीकने पोलिसांना सांगितले असून पीडित व्यक्तीने फोटो पाहून दोघांची ओळखही पटवली आहे. डॉ. रविंद्र पाल सिंग यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणावर बुधवारी निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.

Kidney Sold Case SIT : आंतरराष्ट्रीय कनेक्शन, मोठे रॅकेट कार्यरत? चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना

नागभीड तालुक्यातील रोशन कुडे या युवा शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथकाची ( SIT) स्थापना केली आहे. जिल्हा पातळीवरील हे पथक असून अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात आणि पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे. अवयव विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन बघता यात एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास प्रामुख्याने हे पथक करणार आहे.

आणखी वाचा