Chandrapur Crime News : मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तालुका क्रीडा अधिकाऱ्याची फसवणूक; 28 लाखांचा घातला गंडा!
Chandrapur Crime News : मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यात एका तालुका क्रीडा अधिकार्याची तब्बल 28 लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Chandrapur Crime News : मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यात एका तालुका क्रीडा अधिकार्याची तब्बल 28 लाखांनी फसवणूक (Crime News) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे फसवणूक (Fraud) करणारा आरोपी हा त्याच कार्यालयातील एक कंत्राटी कर्मचारी आहे. प्रशांत आक्केवार असं या कंत्राटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो सध्या फरार आहे. तर त्याचा साथीदार राजू पुद्दतवार याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या फसवणुकीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून फरार प्रशांत आक्केवार याचा शोध घेत आहे.
मूल नगर परिषदेसह इतर अनेक ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुल तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे यांच्या मुलाला तलाठी पदावर नोकरी लावण्याचं आश्वासन देत आमिष दाखवून या आरोपींनी 28 लाखांची फसवणूक केली. मात्र ही फसवणूक उघडकीस येताच ठिकरे यांनी मुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर दोन्ही आरोपींविरोधात विरोधात गुन्हा दाखल झाला. या दोन आरोपींनी मूल नगर परिषदेसह इतर अनेक ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारची फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
बांधावरील झाडं तोडण्यास विरोध, महिलेसह कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला
बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्यावर, एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार वडवणी तालुक्यात घडलाय. देवळा ते कोरडे वस्ती दरम्यान पायवाटेवर असलेल्या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं झाड तोडण्याचा जाब विचारताच, तिला मारहाण करण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबिय घटनास्थळी पोहोचताच, हातातील काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली.
16 जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी बालकृष्ण शिंदे याच्यासह 16 जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार, निश्चितच संतापजनक आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी मात्र फरार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























